शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
3
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
6
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
7
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
8
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
10
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
11
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
12
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
13
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
14
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
15
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
16
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
17
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
18
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
19
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
20
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
Daily Top 2Weekly Top 5

तीर्थक्षेत्र विकास, जनसुविधेच्या कामांना ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 14:34 IST

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर निधी खर्चाच्या ताळमेळासाठी ही कामे थांबविली जात असल्याचे पत्र ४ डिसेंबर रोजी देण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मोठ्या व लहान ग्रामपंचायतींनी विकास कामांसाठी अनुदान तसेच तीर्थक्षेत्र विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून चालू वर्षात वाटप केलेल्या चार कोटींच्या निधीपैकी अनेक कामांचे कार्यारंभ न दिल्याने त्या कामांचा खर्च थांबविण्यात आला आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यांची माहिती अद्यापही न आल्याने एकूण किती निधीची कामे थांबणार आहेत, हे येत्या दोन-तीन दिवसांत स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर निधी खर्चाच्या ताळमेळासाठी ही कामे थांबविली जात असल्याचे पत्र ४ डिसेंबर रोजी देण्यात आले आहे.मोठ्या व लहान ग्रामपंचायतींच्या जनसुविधा, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात चार कोटींचा निधी पंचायत समिती स्तरावर वाटप केला. तो देताना ३१ मार्च २०२० पर्यंत कामे पूर्ण करून खर्च करण्याचे बजावण्यात आले. दरम्यान, विधानसभा निवडणूक पार पडली. राज्यात सत्तांतर झाले. त्याचवेळी महायुती शासनाच्या काळातील सर्वच कामांचा आढावा घेत श्वेतपत्रिका काढण्याचेही नव्या मुख्यमंत्र्यांनी ठरविले. त्यामुळे आता जी कामे सुरूच झाली नाही, ती थांबणार आहेत. त्या कामांची माहिती पंचायत विभागाने मागविली. त्यापैकी चार तालुक्यांची माहिती अप्राप्त आहे. माहिती आल्यानंतर कामे थांबविण्याचा आदेश पंचायत विभागाकडून दिला जाणार आहे.जिल्हा वार्षिक योजनेतून जनसुविधा कामांच्या एक कोटी रुपये निधीचे वाटप जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना करण्यात आले. त्यामध्ये अकोला तालुक्यातील पाच गावे-२४ लाख, अकोट- पाच गावांमध्ये २४ लाख, बाळापूर- दोन गावांमध्ये १० लाख, मूर्तिजापूर- चार गावांमध्ये १९ लाख, तेल्हारा- तीन गावांमध्ये १९ लाख, पातूर-आलेगाव येथे चार लाख रुपये देण्यात आले.लहान ग्रामपंचायतींमध्ये जनसुविधांसाठी दोन कोटी रुपये वाटप करण्यात आले. त्यामध्ये अकोला- २२ ग्रामपंचायतींना ६६ लाख, अकोट- १३ ग्रामपंचायतींना ३८ लाख, बाळापूर- चार ग्रामपंचायतींना १२ लाख, बार्शीटाकळी- ८ गावे- २४ लाख, तेल्हारा- ६ गावे-१८ लाख, मूर्तिजापूर- ८ गावे- २४ लाख, पातूर- ६ गावे - १८ लाख रुपये निधी वाटप करण्यात आले.तीर्थक्षेत्र विकासासाठी १ कोटीतीर्थक्षेत्र विकास कामांसाठी प्राप्त एक कोटी रुपयांतून अकोला तालुक्यात आठ संस्थानांसाठी ३७ लाख रुपये, अकोट तालुक्यातील तीन गावांत १८ लाख, बार्शीटाकळी-३ गावे- १० लाख, तेल्हारा- ४ गावे २० लाख, पातूर- २ गावे- सात लाख, मूर्तिजापूर- २ गावे- आठ लाखांचे वाटप करण्यात आले.

 

टॅग्स :Akolaअकोला