शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘एचआरसीटी’चाचणीच्या नावाखाली होणाऱ्या लुटीला ब्रेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 11:17 IST

सर्वसामान्यांच्या या लुटीला ब्रेक लावून शासनाने ‘एचआरसीटी’चाचण्यांचे दर निश्चित केले आहेत.

अकोला: जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असल्याने नागरिक धास्तावले आहेत. हीच संधी साधत काही खासगी रुग्णालयांमध्ये एचआरसीटी चाचणी करणे सक्तीचे करून त्यासाठी जादा पैसे आकारण्याचे प्रकार वाढले होते. सर्वसामान्यांच्या या लुटीला ब्रेक लावून शासनाने ‘एचआरसीटी’चाचण्यांचे दर निश्चित केले आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाय योजना केल्या जात आहेत. यानंतरही कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांमधील याच भीतीचा फायदा घेत खासगी रुग्णालयांमध्ये एचआरसीटी चाचणी सक्तीची केल्याचे प्रकार घडले आहेत. शिवाय, यासाठी जादा शुल्कही आकारण्यात येत होते. गरज नसताना सातत्याने केली जाणारी तपासणी अन् त्यातील रेडिएशनमुळे शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो. एखाद्या रुग्णाला खरच एचआरसीटीची गरज असल्यास डॉक्टर तसे सुचववितातही; परंतु डॉक्टरांचे अशा प्रकारे कुठल्याही स्वरूपाचे प्रिस्क्रीप्शन नसतानाही अनेकांनी एचआरसीटी चाचणी करून घेतली आहे. जवळपास चार ते साडेचार हजार रुपये एका चाचणीसाठी आकारले जात होेते. चाचणीच्या नावावर रुग्णांची होत असलेली लूट शासनाच्या निदर्शनास येताच शासनाने दर निश्चित करून या प्रकाराला ब्रेक लावला.असे आहेत निश्चित दर

  • १६ पेक्षा कमी स्लाइस क्षमतेच्या मशीनसाठी -२००० रुपये
  • १६ ते ६४ स्लाइस क्षमतेच्या मशीनसाठी - २५०० रुपये
  • ६४ पेक्षा जास्त स्लाइस क्षमतेच्या मशीनसाठी - ३००० रुपये

तर रुग्णालयावर कारवाईखासगी रुग्णालयांसह संबंधित केंद्रांना ‘एचआरसीटी’ चाचणीचे निश्चित दरपत्रक दर्शनी भागात लावणे अनिवार्य आहे. निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त शुल्क आकारल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे शासनाच्या निर्णयात म्हटले आहे.शासनाने एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित करून दिले आहेत. या दरापेक्षा जास्त दराने शुल्क आकारल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या