अकोला : विदर्भ हॉस्पीटलजवळ असलेल्या एका बारमध्ये घुसून तोडफोड केल्याप्रकरणी खदान पोलिसांनी मंगळवारी युवकाला अटक केली. रामलता बिझनेस सेंटरजवळील महाकाली वाईनबारमध्ये सोमवारी रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास कौलखेड येथे राहणारा सचिन अशोक ठाकूर (३७) हा बसलेला होता. यावेळी चिखलपुर्यात राहणारा आरोपी सोपान कदम हा बारमध्ये आला. त्याने सचिनसोबत वाद घातला. वाद विकोपाला पोहोचल्याने आरोपी सोपान कदम याने बारमधील काचेच्या बाटल्या फेकल्या आणि दरवाजा तोडला. आरोपींविरुद्ध खदान पोलिसांनी सोमवारी रात्री भादंवि कलम ४२७, ४५२, ५0४, ३२३, ५0६ नुसार गुन्हा दाखल केला.
बारमध्ये तोडफोड करणारा गजाआड
By admin | Updated: June 4, 2014 01:25 IST