शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एक शाखा; एकशे एक वृक्षाची लागवड  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 15:48 IST

शिवसेना शहर संघटिका वर्षा अरविंद पिसोडे यांनी एक शाखा एकशे एक वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे.

अकोला: निवडणुका आल्या की राजकीय पक्ष नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ऊत येतो. सभा, दौरे, मिरवणुका आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेचे आम्हीच खरे कैवारी असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करतात; मात्र प्रत्यक्षात कार्य कमी आणि प्रचार जास्त असतो; मात्र शिवसेनेत ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करण्याचा आदर्श अकोल्यातील शिवसेना महिला शाखेच्या पदाधिकारी करीत आहे. सामाजिक भान गमाविणाऱ्यांना आरसा दाखविण्याचे कार्य अकोल्यातील शिवसेना शहर संघटिका वर्षा अरविंद पिसोडे करीत आहे.दिवसेंदिवस वाढत असलेले तापमान आणि पाणी टंचाईच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी वृक्ष लागवडशिवाय पर्याय नाही. ही बाब प्रत्याक्षिकातून पटवून सांगण्यासाठी शहर संघटिका पिसोडे यांनी एक शाखा एकशे एक वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे. केवळ शाखा स्थापन करणे हा उद्देश नाही तर प्रत्येक महिला शाखेने महिलांची संख्या वाढविणे आणि त्या माध्यमातून वृक्षारोपण करणे हा होय. असे प्रत्येक शाखा उद्घाटनाच्या वेळी सांगितले जात आहे.जिल्ह्यात शिवसेनेच्या शाखा स्थापनेसोबतच वृक्ष लागवडीची ही चळवळ सुरू झाली असून, ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. बोरगाव खुर्द येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. भगवत सप्ताह अंतर्गत वृक्षारोपण करून शिवसेना महिला आघाडीने सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे. संपर्क संघटिका वैशाली घोरपडे यांच्या मार्गदर्शनात शहर संघटिका वर्षा पिसोडे जिल्हा संघटिका, देवश्री ठाकरे, शुभांगी किनके यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शाखा संघटिका रूपाली वानखेडे, उपशाखा संघटिका रेखा ठाकरे यांच्यासह बहुसंख्य महिला व युवतींची उपस्थिती होती. बोरगाव सोबतच वाळकी येथे शिवसेना महिला आघाडीची शाखा स्थापनेसोबतच वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी विलास खंडारे, चेतन सोनवणे, पवन वानखडे, गजानन सोनवणे, मोहन मनावर यांच्यासह शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते. 

 

टॅग्स :AkolaअकोलाShiv Senaशिवसेना