शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांचा पीक कापणी प्रयोगावरील बहिष्कार मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 14:56 IST

अकोला : कृषी विभागाचे तांत्रिक काम असलेल्या पीक कापणी प्रयोगावर ग्रामसेवकांनी ऐनवेळी बहिष्कार टाकल्याने अडचणीत आलेल्या शासनाने खरिपातील प्रयोगाचे अहवाल द्या, रब्बी हंगामासाठी नव्याने निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याने ग्रामसेवक युनियनने बहिष्काराचा निर्णय मागे घेत खरिपातील पीक कापणी प्रयोग करण्याचे पत्र प्रशासनाला सोम

ठळक मुद्दे राज्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यापुढे पीक कापणी प्रयोगाची कामे करणार नाहीत. त्यांना या कामासाठी सक्ती करण्यात येऊ नये, असे निवेदन शासनाला सादर केले होते.खरिपाचे अहवाल द्या, रब्बीसाठी शासनाकडून निर्णय घेतला जाईल, असे युनियनला कळवण्यात आले. त्यामुळे खरीप हंगामापुरता बहिष्कार मागे घेतल्याचे पत्र युनियनने दिले आहे.

अकोला : कृषी विभागाचे तांत्रिक काम असलेल्या पीक कापणी प्रयोगावर ग्रामसेवकांनी ऐनवेळी बहिष्कार टाकल्याने अडचणीत आलेल्या शासनाने खरिपातील प्रयोगाचे अहवाल द्या, रब्बी हंगामासाठी नव्याने निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याने ग्रामसेवक युनियनने बहिष्काराचा निर्णय मागे घेत खरिपातील पीक कापणी प्रयोग करण्याचे पत्र प्रशासनाला सोमवारी दिले.पीक कापणी प्रयोग करताना सात-बारा, पीक पेरा यामध्ये चुका झाल्यास थेट फौजदारी कारवाई करण्याची तरतूद २५ एप्रिल २०१८ रोजीच्या शासन निर्णयात आहे. त्याचवेळी २४ मे २०१८ रोजीच्या शासन निर्णयातून पीक कापणी प्रयोगातून तलाठी संवर्गाला वगळण्यात आले. तलाठ्याप्रमाणे ग्रामसेवकांनाही त्या कामातून वगळण्यात यावे, या कारणांमुळे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने २०१८ च्या खरीप हंगामापासून पीक कापणी प्रयोगाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यापुढे पीक कापणी प्रयोगाची कामे करणार नाहीत. त्यांना या कामासाठी सक्ती करण्यात येऊ नये, असे निवेदन शासनाला सादर केले होते. त्यावर राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे, सरचिटणीस प्रशांत जामोदे यांच्या स्वाक्षरी आहेत. अकोला जिल्हाधिकाऱ्यांना या बहिष्काराबाबत जिल्हाध्यक्ष रवीबाबू काटे, सचिव महेंद्र बोचरे यांनी १३ आॅगस्ट रोजी पत्र दिले होते. मात्र, शासनासोबत झालेल्या चर्चेनुसार ऐनवेळी बहिष्कार टाकल्यामुळे इतरांना काम देता येत नाही. खरिपाचे अहवाल द्या, रब्बीसाठी शासनाकडून निर्णय घेतला जाईल, असे युनियनला कळवण्यात आले. त्यामुळे खरीप हंगामापुरता बहिष्कार मागे घेतल्याचे पत्र युनियनने दिले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाagitationआंदोलन