शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभरात दोघांचा मृत्यू; नऊ पॉझिटिव्ह, ३८ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 18:00 IST

Akola CoronaVirus News आणखी नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,३९६ झाली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला असला, तरी मृत्यूचे सत्र सुरुच आहे. शनिवार, ३१ आॅक्टोबर रोजी २७ वर्षीय महिलेसह दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २८१ वर पोहचला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,३९६ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ८४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी सात रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये जठारपेठ, मुर्तिजापूर, केशव नगर, वरुळ जऊळका ता. अकोट, मराठा नगर, शासकीय वसाहत, वरुड बु., बार्शीटाकळी व बाभूळगाव ता. पातूर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.महिला व पुरुष उपचारादरम्यान दगावलेशनिवारी कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये वरुळ जऊळका ता. अकोट येथील २७ वर्षीय महिला व जठारपेठ येथील ६९ वर्षीय पुरुष या दोघांचा समावेश आहे. दोघांनाही अनुक्रमे २९ व २८ आॅक्टोबर रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.३८ जणांना डिस्चार्जशनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १४, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, ओझोन, आयकॉन व युनिक हॉस्पिटल येथून प्रत्येकी एक, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले १८ अशा एकूण ३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.२१३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,३९६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,९०२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत २१३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला