शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभरात दोघांचा मृत्यू; ९३ नवे पॉझिटिव्ह, १०० कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 19:12 IST

१२ सप्टेंबर रोजी आणखी दोन रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १७७ वर गेला.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शनिवार, १२ सप्टेंबर रोजी आणखी दोन रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १७७ वर गेला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ८६, नागपूरच्या खासगी प्रयोगशाळेच्या अहवालांमध्ये सात, असे एकून ९३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५३८२ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३५९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ८६ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २७३ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये खोलेश्वर येथील चार, तापडीया नगर व कौलखेड येथील प्रत्येकी तीन, निमवाडी, रामनगर, रणपिसे नगर, बाळापूर नाका, महान व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन, शास्त्री नगर, खेतान नगर, जितापूर ता. अकोट, गीतानगर, जेतवन नगर, मलकापूर, खेडकर नगर, बलोदे लेआऊट, लहान उमरी, अकोट, करोडी ता. अकोट, गोरक्षण रोड, राऊतवाडी, डोंगरगाव, संतोषनगर, खैर मोहम्मद प्लॉट, खडकी, रेणुकानगर, शास्त्री नगर, गजानन पेठ, डाबकी रोड, पारस, कांचनपूर, वाशिंबा, बार्शिटाकळी, वाडेगाव, उमरी व शिर्ला अंधारे येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये बोर्टा ता. मुर्तिजापूर येथील सात, अकोट येथील चार, चोहाट्टा बाजार, दनोरी ता.अकोट, तोष्णीवाल लेआऊट व केशवनगर येथील प्रत्येकी दोन, सुभाष चौक, बाशीर्टाकळी, पळसोद ता.अकोट, नायगाव, डाबकी रोड, आळशी प्लॉट, माळीपुरा, सिंधी कॅम्प, मधूभारती अपार्टमेंट, जूना कापड मार्केट, गजानन नगर डाबकी रोड, भारती प्लॉट जूने शहर, तारफैल, मलकापूर, मनोरथ कॉलनी, तुकाराम चौक व बापूनगर येथील प्रत्येकी रुग्णाचा समावेश आहे.

शास्त्री नगर, जठारपेठ येथील पुरुषाचा मृत्यूशनिवारी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापैकी एक रुग्ण जिल्हा परिषद कॉलनी, शास्त्री नगर, अकोला येथील ६० वर्षीय पुरुष असून, त्यांना ११ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. जठारपेठ येथील ४७ वर्षीय पुरुषाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

१०० जणांना डिस्चार्जशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४३, कोविड केअर सेंटर अकोला येथून १३, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, कोविड केअर सेंटर, अकोट येथून ११, कोविड केअर सेंटर बाशीर्टाकळी येथून तीन, तर कोविड केअर सेंटर, हेंडज मुर्तिजापूर येथून २५ अशा एकूण १०० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.१०८८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५३८२ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४११७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १७७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १०८८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला