अकोला : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी होण्याची कोणतीच चिन्हे नाहीत. शुक्रवार, १६ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यात आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या २६३ झाली आहे. दरम्यान, २२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७९७० झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे १२१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ९९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये शिवनी, सिंधी कॅम्प व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन जणांसह खडकी, गोडबोले प्लॉट, जीएमसी हॉस्टेल, उमरी, जठारपेठ, विद्युत कॉलनी, व्दारका नगरी, संभाजी नगर, करोडी ता अकोट, राऊतवाडी, मारोडा, जीएमसी, भीमनगर, उगावा व पैलपाडा येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी जठारपेठ येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.उगवा व शिवर येथील रुग्णांचा मृत्यूशुक्रवारी कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये उगवा येथील ६५ वर्षीय पुरुष व शिवर येथील महिलेचा समावेश आहे. दोघांनाही अनुक्रमे १४ व नऊ आॅक्टोबर रोजी दाखल करण्यात आले होते.१२ जणांना डिस्चार्जशुक्रवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून आठ, आयकॉन हॉस्पीटल येथून एक, ओझोन हॉस्पीटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून एक, अवघाते हॉस्पीटल येथून एक अशा एकूण १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.४०८ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,९७१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,३०० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २६३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४१९ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
दिवसभरात दोघांचा मृत्यू; २२ नवे पॉझिटिव्ह; १२ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 18:26 IST