शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचे दारूबंदीसाठी बोरगावात शक्ति प्रदर्शन

By admin | Updated: July 10, 2017 02:17 IST

स्वाक्षरी पडताळणीला १४२९ महिला हजर

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव मंजू : बोरगाव मंजू शहरातील कार्यरत देशी दारू दुकाने, बियर शॉपी, वाईन बार, मद्यविक्री कायमस्वरूपी बंद करण्याबाबत महिला दारुबंदी संघर्ष समितीने २९ जून रोजी जिल्हाधिकारी, अधीक्षक दारू उत्पादन शुल्क, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना एका निवेदन देऊन दारुबंदीकरिता निवडणूक घेण्याची मागणी केली होती. दरम्यान प्राप्त महिलांच्या निवेदनानुसार कार्यवाहीबाबत जिल्हा प्रशासनाने गावातील महिला मतदारांच्या एकूण २५ टक्केपेक्षा जास्त त्यांच्या तक्रारी अर्जावरील स्वाक्षऱ्या पडताळणी अनिवार्य असल्याने प्रशासनाने रविवारी येथील प. नाईक विद्यालयात स्वाक्षऱ्या पडताळणी करण्यात आली असून एकूण १४२९ महिलांनी आज सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत एकच झुंबड करून एकूण १४२९ महिलांनी आपल्या सह्यांची पडताळणी केली. दरम्यान संबंधितांनी त्वरित दारुबंदीकरिता निवडणुकीची मागणी केली.आज सकाळपासून पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, दारू उत्पादन शुल्क विभाग आदी अधिकारी व कर्मचारी यांनी हजेरी लावून प्रत्यक्ष स्वाक्षऱ्या पडताळणीचे काम केले तर दारुबंदी महिला संघर्ष समिती महिला व पुरुष यांनी प्रत्येक महिलांचा प्रत्यक्ष भेटी देऊन प्रसार व प्रचार केल्याने स्वाक्षरीच्या प्राप्त झालेल्या निवेदनावरील एकूण स्वाक्षऱ्यांच्या २५ टक्के महिला मतदारांची स्वाक्षरी पडताळणी करण्याची गरज ोती तर १४२९ महिलांच्या स्वाक्षरीची पडताळणी करण्यात आली. त्यामुळे आता जिल्हाप्रशासनाने त्वरित निवडणूक घ्यावी व आम्हा महिलांना न्याय द्यावा, असे बोरगाव मंजू शहरातील महिलांनी प्रशानाला साकडे घातले आहे. दरम्यान सकाळपासूनच येथील महिलांनी पडताळणी केंद्रावर मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करून कायमचीच दारू बंद करण्याची मागणी केली आहे, हे विशेष.