शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

राज्यातील महापालिकांना २०६ कोटींचा बुस्टर डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 3:28 PM

महापालिकांना १ टक्के मुद्रांक शुल्क अधिभाराच्या रकमेपोटी २०६ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

अकोला: महापालिका क्षेत्रातील मालमत्तांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला महसूल प्राप्त होतो. या बदल्यात राज्य शासनाकडून संबंधित महापालिकांना १ टक्के मुद्रांक शुल्क अधिभाराच्या रकमेपोटी २०६ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. या रकमेमुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या नागरी स्वायत्त संस्थांना दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील २६ महापालिका क्षेत्रात होणाऱ्या मालमत्तांच्या खरेदी-विक्रीतून शासनाकडे मोठ्या प्रमाणात महसूल जमा होतो. या महसुलाच्या मोबदल्यात राज्य शासनाकडून संंबंधित नागरी स्वायत्त संस्थांना १ टक्के मुद्रांक शुल्क अधिभाराची २०६ कोटींची रक्कम देण्यात आली आहे. यामध्ये जुलै व आॅगस्ट महिन्यातील अधिभाराच्या रकमेचा समावेश आहे. सर्वाधिक ४९ कोटी ४५ लाख रुपये पुणे मनपाकडे वर्ग करण्यात आले आहेत. अमरावती विभागातून अमरावती मनपाला २ कोटी १६ लाख ४९ हजार आणि अकोला मनपाला केवळ ४३ लाख ५८ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. शासनाने दोन महिन्यांच्या रकमेचे वितरण केल्यामुळे थकीत वेतनामुळे नाराज असलेल्या मनपा कर्मचाऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाल्याचे बोलल्या जात आहे.मजीप्राच्या थकीत रकमेची कपातअकोला, परभणी व धुळे महापालिकेकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. थकीत रकमेचा भरणा करण्यास तीनही स्वायत्त संस्था अपयशी ठरल्याचे लक्षात आल्यानंतर राज्य शासनाने १ टक्के मुद्रांक शुल्कापोटी अदा केली जाणाºया रकमेतून काही रक्कम मजीप्राच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच परभणी मनपाला केवळ १३ लाख ३६ हजार व धुळे मनपाला २१ लाख १० हजार रुपयांचे वितरण करण्यात आल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका