शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

वाचुन झालेली पुस्तके ग्रंथलयात दान करावी - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 17:14 IST

अकोला- वाचन संस्कृती समृध्द करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या वाढदिवसाच्या यथा शक्ती पुस्तके वाचनालयात दान करावी. असा संकल्प करावा असे आवाहन गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले. 

ठळक मुद्दे ई-लायब्रीरच्या इमारतीचे लोकार्पण गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई वाघोडे या होत्या. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुसज्ज असे ई-लायब्ररी सुरू करावी अशी मागणी आमदार बाजोरीया यांनी केली.

अकोला- वाचन संस्कृती समृध्द करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या वाढदिवसाच्या यथा शक्ती पुस्तके वाचनालयात दान करावी. असा संकल्प करावा असे आवाहन गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.  आपण जे बघतो, जे वाचतो तेच आत्मसात करतो. हे आत्मसात केलेले ज्ञान आपले जीवनात बदल घडविण्यासाठी उपयोगी पडते. यामुळे विदयार्थ्यांच्या सोईसाठी व त्यांना ज्ञान प्राप्त होण्यासाठी सामाजिक दायित्व म्हणुन ई-लायब्ररी साठी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्य पुर्ण योजनेतुन निधी उपलब्ध करुन दिला, ज्ञान हे वाघीणीचे दुध असुन ग्रंथ वाचनाने मानवाला कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची ताकद मिळते. कोणतीही गोष्ट रद्दी होत नाही म्हणुन आपल्याकडील वाचुन झालेली पुस्तके ग्रंथलयात दान करावी. असे आवाहन त्यांनी केले.जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने 1 कोटी 81 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या तीन मजली अध्यावत नविन विस्तारीत ई-लायब्रीरच्या इमारतीचे लोकार्पण गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई वाघोडे या होत्या. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरीया यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुसज्ज असे ई-लायब्ररी सुरू करावी अशी मागणी आमदार बाजोरीया यांनी केली. व ई-लायब्ररीचा लाभ घेण्याची युवकांना आवाहन केले.वाचन संस्कृती वाढविण्यासाठी या लायब्ररीचा फायदा होईल असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या वाघोडे यांनी सांगीतले. े प्रास्ताविक अमरावती येथील शासकीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल राजेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन बाळकृष्ण बिडवाईक यांनी केले. यावेळी सिंधु सिनीअर सिटीजन असोशिएशनेचे अध्यक्ष ग्यानचंद वाधवानी यांनी शंभर पुस्तके भेट दिली.या कार्यक्रमाला माजी आमदार जगन्नाथ् ढोणे , नारायण गव्हाणकर, माजी महापौर उज्वलाताई देशमुख , नगरसेवक हरिश अलिमचंदाणी , गोपी ठाकरे , आशिष पवित्रकार, अमरावती विभागाचे सहायक ग्रंथालय संचालक जगदिश पाटील , सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एमआर चव्हाण, अमरावतीचे ग्रंथालय अधिकारी दिपक गेडाम, ?ड.मोतीसिंग मोहता, डॉ.अशोक ओळंबे, सत्यनारायण बाहेती, सनातन वाचनालयाचे श्रीकिसनजी अग्रवाल यांच्यासह ग्रंथालय विभागाचे अधिकारी कर्मचारी विविध वाचनालयाचे पदाधिकारी, स्पर्धा परिक्षेचे विदयार्थी यांची उपस्थिती होती.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटीलGopikishan Bajoriaगोपीकिशन बाजोरीया