शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळय़ांच्या ‘शत्रू’चे संवर्धनही प्रयोगशाळेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 02:14 IST

कपाशीवरील गुलाबी बोंडअळीला प्रतिबंध घालणारी परोपजीवी मित्र कीटक (ट्रायकोग्रामा) वाढविण्यावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भर दिला असून, या मित्र कीटकाची प्रयोगशाळेत निर्मिती व संवर्धन केले जात आहे. शेतकर्‍यांनी समूहाने कपाशीवर वापर केल्यास तिन्ही प्रकारच्या बोंडअळ्यांवर नियंत्रण मिळविता येईल, तसेच रासायनिक कीटकनाशकांचा वाढलेला अनावश्यक खर्च टाळता येईल, असा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे.

ठळक मुद्देशेतकर्‍यांनी करावा वापरकपाशीवरील कीटकनाशकांचा खर्च होणार कमी!

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कपाशीवरील गुलाबी बोंडअळीला प्रतिबंध घालणारी परोपजीवी मित्र कीटक (ट्रायकोग्रामा) वाढविण्यावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भर दिला असून, या मित्र कीटकाची प्रयोगशाळेत निर्मिती व संवर्धन केले जात आहे. शेतकर्‍यांनी समूहाने कपाशीवर वापर केल्यास तिन्ही प्रकारच्या बोंडअळ्यांवर नियंत्रण मिळविता येईल, तसेच रासायनिक कीटकनाशकांचा वाढलेला अनावश्यक खर्च टाळता येईल, असा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे.  कापूस हे नगदी पीक आहे; पण या पिकाचे सर्वाधिक नुकसान बोंडअळी प्रजातीची कीड करीत असते. बोंडअळीला प्रतिबंधक रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्या करू नही ही कीड आटोक्यात येत नसल्याने दीड दशकापूर्वी एका विदेशी कंपनीने बोंडअळीला प्रतिबंधक जनुक टाकून बीटी कापूस तंत्रज्ञान भारतीय बाजारात आणले. या बीटीने बघता-बघता संपूर्ण देश व्यापून अख्ख्या बियाणे बाजारावर कब्जा केला; पण अलीकडच्या दोन ते तीन वर्षांत बीटी कपाशीवर बोंडअळीच्या प्रतिकारक्षम पिढय़ा तयार झाल्या असून, बीटी कपाशीवरही त्यांनी हल्ला केला आहे. या अळीच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे पंजाब, हरियाणासारख्या कापूस उत्पादक राज्यातील बीटी कापसावर गुलाबी बोंडअळ्यांनी आक्रमण केले. त्यामुळे तेथील शेतकर्‍यांनी बीटी कापसाची पेरणी कमी केली. या सर्व पृष्ठभूमीवर अकोल्याच्या कृषी विद्यापीठाने गुलाबी बोंडअळीला  प्रभावी प्रतिबंधक (ट्रायकोग्रामा) परोपजीवी मित्र कीटकाच्या निर्मिती व संवर्धनावर भर दिला आहे. या मित्र कीटकाचा वापर केल्यास गुलाबी, अमेरिकन आणि ठिपक्यांच्या बोंडअळीवर नियंत्रण मिळवता येते, हे विशेष. त्यासाठी मात्र हंगामाच्या सुरुवातीपासून, गावपाळीवर अवलंब करावा लागणार आहे.

मित्र कीटकांचे संवर्धन!तांदळातील अळीच्या पंतगांची अंडी गोळा करू न या अंड्यांच्या नर-माधीचे प्रयोगशाळेत संगोपन केले जात आहे. संगोपन केलेली अंडी एका पिवळ्या जाड्या कागदावर चिकटवून तो पिवळा कागद कापसाच्या फांदीला बांधला जातो. या कागदावरील अंड्यातून सात ते आठ दिवसांनतंर ट्रायकोग्रामा बाहेर येतात, तसेच कापसावरील बोंडअळीतील अंड्यांचा शोध घेतात. कापूस असलेल्या बोंडात शिरू न कापसाचे कोणतेही नुकसान न होऊ देता गुलाबी बोंडअळय़ांना फस्त करते. विशेष म्हणजे, हे तंत्रज्ञान एका एकारावर वापरण्यासाठी शेतकर्‍यांना फक्त १00 रुपये खर्च येतो. एका पिवळ्या कागदाच्या पट्टीवर वीस भाग असतात. एका भागावर जवळपास २,५00 अंडी ठेवली जातात. त्यामुळे शेतकर्‍यांचा खर्च वाचतो व पिक ाचे संरक्षण होते.

 ट्रायकोग्रामा ही एक पर्यावरणपूरक व बिनविषारी मित्र कीटकांचा प्रकार आहे. कपाशीवरील बोंडअळीचे प्रभावी नियंत्रण करते आणि खर्चही कमी लागतो. शेतकर्‍यांनी हंगामाच्या सुरुवातीला याचा वावर करावा, शेतकर्‍यांच्या मागणीनुसार कृषी विद्यापीठालाही हे तंत्रज्ञान देता येईल.- डॉ.डी.बी. उंदीरवाडे, विभाग प्रमुख, 

टॅग्स :Akola cityअकोला शहर