शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवर बोंडअळीचा प्रकोप वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 12:42 IST

डिसेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून या अळीचा कपाशी पिकावर प्रकोप वाढला आहे.

अकोला : बदलते हवामान पिकावरील किडींना पोषक ठरत असून, कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रकोप वाढला आहे. तसेच उत्पादनही घटल्याने शेतकऱ्यांनी शेतातील उभ्या कपाशी पिकावर नांगर फिरविण्यास सुरुवात केली आहे. पाण्याची व्यवस्था उपलब्ध असलेल्या ठिकाणी शेतकºयांनी रब्बी गहू पिकाची पेरणी करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी शेतकºयांना पुन्हा पैशाची तजवीज करावी लागत आहे.विदर्भात यावर्षी १७ लाख ४९ हजार हेक्टरवर कपाशी पेरणी झाली आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाला उशीर झाल्याने पेरणीला विलंब झाला. पीक वाढीच्या अवस्थेत सतत पाऊस सुरू राहिल्याने झाडांच्या मुळांना प्रकाश संश्लेषण झाले नाही. परिणामी, अन्नद्रव्याचा पुरवठा न झाल्याने त्याचा परिणाम पिकाच्या वाढीवर झाला. त्यामुळे यावर्षी कपाशीचा हंगाम एक महिना पुढे लांबला. या सर्व परिस्थितीचा या पिकावर प्रतिकूल परिणाम होत असताना सद्यस्थितीत पुन्हा पाऊस आणि सतत ढगाळ वातावरण तयार होत आहे. हे वातावरण पिकावरील कीड, रोगांना पोषक ठरत आहे. तसेच ते गुलाबी बोंडअळीला अधिकच पोषक ठरत असून, डिसेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून या अळीचा कपाशी पिकावर प्रकोप वाढला आहे. तद्वतच उत्पादनही घटल्याने आता कपाशी नको म्हणून पश्चिम विदर्भातील शेकडो शेतकºयांनी उभ्या कपाशी पिकावर नांगर फिरविला आहे.उशिरापर्यंत पाऊस राहिल्याने यावर्षी रब्बीचा हंगामही लांबला आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत हरभरा पेरणी करावी, अशी कृषी विद्यापीठाची शिफारस असते. यावर्षी १५ डिसेंबरपर्यंत शेतकºयांनी हरभरा पेरणी केली आहे. गहू पिकाची पेरणी १५ जानेवारीपर्यंत करण्यात येणार असल्याने कापूस उत्पादक शेतकºयांनी कपाशी पीक काढून त्या जागी गहू पीक घेण्याचे नियोजन केले आहे; परंतु ज्या शेतकºयांकडे सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे, त्यांनीच कपाशी पीक काढून रब्बी पीक घेण्यावर भर दिला आहे. यासाठी शेतकºयांना मात्र पैशाची तजवीज करावी लागत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी