शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

बोंडअळी प्रादुर्भाव; केंद्रीय पथक आले अन् गेले; अकोल्यात केवळ मुक्काम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 02:30 IST

अकोला : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील कपाशी पीक नुकसानाची माहिती घेण्यासाठी केंद्रीय तांत्रिक मूल्याकंन समिती गुरुवारी रात्री उशिरा अकोल्याला आली. रात्री येथे मुक्काम करू न शुक्रवारी मराठवाड्याकडे जाता-जाता पातूर तालुक्यातील रस्त्यावरील कापूस पिकाची माहिती घेऊन सकाळी  ९ वाजताच्या सुमारास मराठवाड्याकडे प्रयाण केले. त्यामुळे जिल्हय़ातील शेतकर्‍यांमध्ये आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देजाता-जाता  पातूर तालुक्यातील कपाशीची  केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील कपाशी पीक नुकसानाची माहिती घेण्यासाठी केंद्रीय तांत्रिक मूल्याकंन समिती गुरुवारी रात्री उशिरा अकोल्याला आली. रात्री येथे मुक्काम करू न शुक्रवारी मराठवाड्याकडे जाता-जाता पातूर तालुक्यातील रस्त्यावरील कापूस पिकाची माहिती घेऊन सकाळी  ९ वाजताच्या सुमारास मराठवाड्याकडे प्रयाण केले. त्यामुळे जिल्हय़ातील शेतकर्‍यांमध्ये आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने राज्यात कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या पृष्ठभूमीवर बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या कपाशीची माहिती घेण्यासाठी १ व २ फेब्रुवारी रोजी केंद्र शासनाच्या कृषी खात्यांतर्गत तांत्रिक मूल्यांकन समितीचा दौरा होता. या समितीमध्ये मुरली कृष्णा, डॉ. आर. पी. सिंग, डॉ. राजेंद्रन, डॉ. ए.एन. सिंग, डॉ. एस.डब्ल्यू.ए. रेड्डी, डॉ. संजय कालिया, डॉ. जी. बालसुब्रमण्यम, डॉ. पी. चक्रवती, डॉ. एस. एस. बंगा हे सदस्य आहेत. अकोल्याला डीसीडीचे संचालक डॉ.आर.पी. सिंग नागपूर, ओ.पी. गोवका, डॉ. एस.डब्ल्यू.ए. रेड्डी, डॉ. जी. बालसुब्रमण्यम व राजेश प्रसाद रस्तोगी यांचा समावेश होता. अकोला जिल्हय़ात ही समिती पाहणी करणार होती. पण, गुरुवारी रात्री उशिरा ही समिती अकोल्यात पोहोचली. रात्री मुक्काम केल्यांनतर सकाळी ८.३0 वाजता समितीतील सदस्य मराठवाड्याकडे रवाना झाले. जाता-जाता या समितीने पातूर व अकोला तालुक्यातील रस्त्यावरील शेतातील कपाशीची पाहणी केली. दरम्यान, मराठवाड्यातील बोंडअळीने प्रादुर्भावग्रस्त भागांना भेटी देत औरंगाबाद विमानतळावरू न ही समिती दिल्लीला रवाना होणार असल्याचे वृत्त आहे. राज्यात बोंडअळीने कापसाचे प्रचंड नुकसान झाले असून, केंद्र शासनाकडून आपत्ती निवारण निधी मिळावा, यासाठी राज्य सरकारने मदतीसाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव दिला आहे. या पृष्ठभूमीवर केंद्र शासनाने वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी या तांत्रिक मूल्यांकन समितीला विदर्भ- मराठवाड्याच्या दौर्‍यावर पाठविले आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरcottonकापूस