शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अपार्टमेंटमध्ये पार्किंगच्या जागेवर उभारले बॉयलर; मनपाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 13:40 IST

अकोला: गोरक्षण रोडवरील कल्पतरू अपार्टमेंटमधील सदनिकाधारकांसाठी राखीव असणाऱ्या पार्किंगच्या जागेवर हॉटेल वैभवच्या संचालकांनी चक्क बॉयलर उभारले असून, यामुळे स्थानिक रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे महापालिका प्रशासनाने हॉटेल वैभवच्या इमारतीचा काही भाग हटविण्याचे निर्देश हॉटेल संचालकांना दिले होते. हॉटेलच्या इमारतीचा काही भाग संचालक ांनी हटविल्यानंतर चक्क त्याच अपार्टमेंटमधील पार्किंगच्या जागेवर बॉयलर उभारले. या बॉयलरमुळे उन्हाच्या दाहकतेत वाढ झाली असून, इमारतीला तडे जात आहेत.

अकोला: गोरक्षण रोडवरील कल्पतरू अपार्टमेंटमधील सदनिकाधारकांसाठी राखीव असणाऱ्या पार्किंगच्या जागेवर हॉटेल वैभवच्या संचालकांनी चक्क बॉयलर उभारले असून, यामुळे स्थानिक रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाला वारंवार पत्र, निवेदन दिल्यावरसुद्धा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती कल्पतरू अपार्टमेंट निवासी व व्यावसायिक हक्क समितीच्या पदाधिकाºयांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी रहिवाशांनी केली.गोरक्षण रोडवर इन्कमटॅक्स चौकातील ‘बॉटल नेक’दूर करण्याच्या उद्देशातून महापालिका प्रशासनाने हॉटेल वैभवच्या इमारतीचा काही भाग हटविण्याचे निर्देश हॉटेल संचालकांना दिले होते. त्यानुसार कल्पतरू अपार्टमेंटमधील हॉटेलच्या इमारतीचा काही भाग संचालक ांनी हटविल्यानंतर चक्क त्याच अपार्टमेंटमधील पार्किंगच्या जागेवर बॉयलर उभारले. अपार्टमेंटमधील सदनिकाधारकांसाठी राखीव असणाºया पार्किं गच्या जागेवर मनपा प्रशासनाच्या परवानगीशिवाय बॉयलर उभारण्यात आल्याची माहिती यावेळी अपार्टमेंटमधील रहिवाशी व व्यावसायीकांनी दिली. या बॉयलरमुळे उन्हाच्या दाहकतेत वाढ झाली असून, इमारतीला तडे जात आहेत. निवासी गाळ््यामध्ये बॉयलर व स्वयंपाकगृह सुरू केल्यामुळे रहिवाशांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मनपाच्या परवानगीशिवाय निवासी सदनिकेचा व्यावसायिक वापर केला जात असून, बॉयलरमुळे मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता रहिवाशांनी व्यक्त केली. इमारतीमधील अतिक्रमण, उभारलेले बॉयलर व व्यावसायिक उद्देशातून होणारा वापर पाहता इमारतीला धोका निर्माण झाल्याची माहिती कल्पतरू अपार्टमेंट निवासी व व्यावसायिक हक्क समितीच्या पदाधिकाºयांनी यावेळी दिली. यासंदर्भात मनपा प्रशासनासह खदान पोलीस ठाण्यात निवेदने, तक्रार केल्यानंतरही कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात सापडला आहे. भविष्यात कल्पतरू अपार्टमेंटमध्ये काही दुर्घटना घडल्यास त्याला सर्वस्वी मनपा आयुक्त, क्षेत्रीय अधिकारी, परवाना विभाग प्रमुख, नगररचना विभाग प्रमुख आदी जबाबदार राहतील, असे यावेळी रहिवाशांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला इमारतीमधील रहिवासी धर्मेश बिलाखिया, विजय सिरसाट, पी.ई. शेगावकर, विजय सपकाळ, ए.आर.खान, मिलिंद सपकाळ, आशिष बिलाखिया, व्यावसायिक हरिभाई केसरवाणी, संजय गावंडे, सारंगधर हंतोडे, ओमप्रकाश राठी, हितेश जोगी आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका