शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या कामकाजावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 13:47 IST

१५ जिल्ह्यांतील कृषी सहायकांनी नानाजी (पोक रा) देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.

अकोला : कृषी सहायकांच्या अडचणी सोडविण्याकडे शासनाने कानाडोळा केल्याने राज्यातील निवडक १५ जिल्ह्यांतील कृषी सहायकांनी नानाजी (पोक रा) देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे ‘पोकरा’ पोरका झाला असून, या योजनेंतर्गत सर्वच कामे ठप्प पडली आहेत.विदर्भातील खारपाणपट्ट्यासह शेतकऱ्यांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचावण्यासाठी राज्यात ही योजना सुरू करण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून शासनाच्यावतीने राज्यातील शेतीच्या विविध उपाययोजनांवर या योजनेंतर्गत काम करण्यात येत आहे. यामध्ये शेतीचे, आरोग्य पोत सुधारण्यासाठीच्या उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. हवामान बदलामुळे शेती, पिकावर प्रतिकूल परिणाम होत असून, शेतीचे आरोग्य, पोत बिघडली आहे. यात मुख्यत्वे सुधारणा करण्यावर योजनेत भर देण्यात आला आहे. हवामानाला अनुकूल पिके घेता यावी, अल्पभूधारक, मध्यम भूधारक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासह दुष्काळग्रस्तांना आधार देण्यासाठीच्या या योजनेत भर देण्यात आला आहे. फळबागा लागवड, रेशीम शेती, गांडूळ तसेच सेंद्रिय खत निर्मिती केंद्र, मधुमक्षिका पालन, शेतीला पूरक व्यवसाय कुक्कुटपालन आदी सुरू करण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत असून, शासनाकडून अर्थसाहाय्य देण्यात येते. राज्यात पहिल्या टप्प्यातील ही कामे सुरू असतानाच कृषी सहायकांच्या अडचणीकडे शासनाने कानाडोळा केल्याने त्यांनी या योजनेवर असहकार पुकारला आहे.या योजनेत आर्थिक व्यवहाराची कामे बघावी लागत असून, कृषी सहायकाकडे या व्यतिरिक्त अनेक कामे आहेत. तथापि, कृषी विभागाशी निगडित नसलेल्या कामांचीदेखील अंमलबजावणी कृषी सहायकांवर सोपविण्यात आली आहे. कृषी सहायक संवर्गाच्या कर्तव्य जबाबदारीमध्ये समाविष्ट नसलेल्या कृषी सहायकांवर टाकण्यात आल्या आहेत. इतर सर्वच अधिकारी वगळता या योजनेची कामे कृषी सहायकांकडे सोपविण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने केला असून, यासंदर्भात तत्कालीन कृषी मंत्र्यांच्या दालनातील आढावा सभेत कृषी मंत्री, वरिष्ठ अधिकाºयांना अवगत करण्यात आले. शासनाकडून कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नसल्याने गत ११ डिसेंबर २०१९ पासून या प्रकल्पाच्या कामकाजावर कृषी सहायकांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे योजनेची कामे प्रभावित झाली आहेत.

पोकरा’ प्रकल्पांतर्गत कृषी सहायकांवर आर्थिक व्यवहाराच्या जबाबदारीसह कृषी विभागाशी निगडित नसलेल्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अनेकदा यासंदर्भात वरिष्ठांना निवेदने देण्यात आली आहेत. याकडे कानाडोळा करण्यात येत असल्याने प्रकल्पाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.अनंत देशमुख, कोषाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोला