शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शरीर सौष्ठवपटूंना हवे आर्थिक पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 11:11 IST

खेळाडूंना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी प्रतिक्रिया चार वेळा विदर्भ श्री विजेते जीतू गवई यांनी ‘लोकमत’ला दिली.

- रवी दामोदर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोनाच्या पृष्ठभूमिवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक खेळाडू आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे खेळाडूंना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी प्रतिक्रिया चार वेळा विदर्भ श्री विजेते जीतू गवई यांनी ‘लोकमत’ला दिली.गुणवत्ता ठासून भरलेली असल्याने फक्त आधार मिळाल्यास यश संपादन करण्याची जिद्द व कठीण परिश्रम याच्या जोरावर जीतू गवई यांनी बॉडीबिल्डींग क्षेत्रात नावलौकिक मिळविले आहे. त्यांनी सन २०११ पासून बॉडीबिल्डींग स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला. जीतू यांनी मिस्टर अकोला श्री, भीम श्री, तसेच चार वेळा विदर्भ श्री पदकावर आपले नाव कोरले आहे. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची, वडील ग्रामीण डाकसेवक व आई गृहिणी. संसाराचे गाडे सुरू असताना जीतुुला आहार म्हणून दूध, बदाम, कडधान्य, अंडी, मांसाहार व फळे या गोष्टींची जुळवाजुुळव करताना फार ओढातान होते, अशी भावना जीतूचे वडील जगदेव गवई यांनी दिली. तसेच ‘जमेल तितके आम्ही करतो. त्याच्याजवळ परिश्रम करण्याची जिद्द असल्याने केवळ आहाराच्या कमतरतेमुळे त्याच्या प्रगतीचा वेग मंद होईल, अशी चिंताही व्यक्त केली. तसेच खेळाडूंना समाजाने दातृत्वाचा हात दिल्यास हे खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळी गाठू शकतात, असा विश्वास त्यांनी दर्शविला. यावेळी जीतू यांनी दरवर्षी शरीरावर जवळपास ३ लाख रुपये खर्च येतो, असे सांगितले; तसेच सध्या लॉकडाऊनमुळे बॉडीबिल्डरच नव्हे, तर सर्वच खेळाडू आर्थिक विवंचनेत सापडले आहे. त्यामुळे शासनाने मासिक मानधन सुरू करण्याची मागणी त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.

जीम सुरू करा!कोरोनाच्या पृष्ठभूमिवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे जीम बंद ठेवण्यात आले आहेत.त्यामुळे बॉडिबिल्डर खेळाडूंपुढे फिटनेस टिकण्याचे मोठे आव्हान उभे आहे. त्यामुळे तत्काळ जीम सुरू करण्याची मागणी जीतू गवई यांनी केली आहे.

टॅग्स :Akolaअकोलाbodybuildingशरीरसौष्ठव