शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

विद्रुपा नदीत वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 15:03 IST

मृतदेह तेल्हारा तालुक्यातील मनात्री गावाजवळच्या विद्रुपा नदीपात्रात पुलानजीक आढळून आला.

तेल्हारा : तालुक्यातील पंचगव्हाण (उबारखेड)येथील विद्रुपा नदीच्या पुरात  शुक्रवारी वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह रविवार, ११ आॅगस्ट रोजी दुपारी मनात्री येथील पुलाजवळ आढळून आला. प्रशांत बाळकृष्ण गवारगुरु (३५)असे मृतकाचे नाव असून, शोध मोहिमेदरम्यान त्यांचा मृतदेह तेल्हारा तालुक्यातील मनात्री गावाजवळच्या विद्रुपा नदीपात्रात पुलानजीक आढळून आला. उबारखेड येथील  प्रशांत बाळकृष्ण गवारगुरू हा युवक शुक्रवार, ९ आॅगस्ट विद्रुपा नदीवरील पुलावर पूर पाहण्यासाठी आला होता. यावेळी  पुलावरून पाय घसरल्याने तो पुरात पडला. या घटनेची माहिती मिळताच तेल्हारा तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर व तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास देवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन शोध मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते.  पुरात वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेण्यासाठी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन  शोध व बचाव पथकास पाचारण करण्यात आले. पथकासह ग्रामस्थांनी  शोधमोहीम सुरू केली होती.  दोन दिवस शोधमोहिम सुरुच होती. अखेर रविवारी दुपारी मनात्री येथील पुलानजीक प्रशांत गवारगुरु यांचा मृतदेह आढळून आला. तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांच्या मार्गदर्शनात संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे दिपक सदाफळे यांच्या नेतृत्वात त्यांचे सहकारी विकी साटोटे, महेश साबळे, अंकुश सदाफळे, ऋषीकेश तायडे, राजेश इंगळे, चेतन इंगळे, ऋषीकेश राखोंडे, सुरज ठाकुर, आशिष गुगळे, मयुर सळेदार, मयुर कळसकार, गौरव ठाकरे,ऋत्विक सदाफळे यांनी ही शोधमोहिम राबविली. 

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराfloodपूर