शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर दोन दिवसानंतर सापडला पुरात वाहून गेलेल्या वृद्धाचा मृतदेह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 10:57 IST

 दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर रविवार दोनवाडा गावानजीक त्यांचा मृतदेह सापडला.

मूर्तिजापूर : तालुक्यातील एंडली येथील दादाराव वानखडे (वय ६०) हे २४ जुलै रोजी पूर्णा नदीच्या पुरात वाहून गेले होते.   दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर रविवार दोनवाडा गावानजीक त्यांचा मृतदेह सापडला.एंडली येथील दादाराव वानखडे (वय ६०) हे म्हशींना पाणी पाजण्यासाठी गेले असता २४ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान, पूर्णा नदीच्या पुरात वाहून गेले होते. याबाबत तहसीलदारांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती दिली. संत गाडगेबाबा पथकाने २५ जुलैपासून शोध मोहीम सुरू केली. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर रविवार, २६ जुलै रोजी दुपारी पुरात वाहून गेलेल्या दादाराव वानखडे यांचा दोनवाडा गावानजीक मृतदेह सापडला संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे अंकुश सदाफळे, विकी साटोटे, अतुल उमाळे, ऋषिकेश तायडे, धीरज आटेकर, बबलू पवार आणि दोनवाडा येथील श्रीकृष्ण झटाले, प्रमोद आडे, देवानंद झटाले, संतोष आडे, भगवान जामनिक, पवन झटाले, वैभव बचे यांनी मृतदेह शोधला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने दोनवाडा येथे आणण्यासाठी पथकातील जवानांना कसरत करावी लागली. गत दोन दिवसांपासून पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वात शोध मोहीम सुरू होती. रविवारी सकाळपासूनच दोन रेस्क्यू बोटने एंडलीपासून शोध सुरू केला. रेस्क्यू बोट लाखपुरीपर्यंत येताच संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या टीम व दोनवाडा येथील नागरिक यांच्या मदतीने मृतदेह सापडला. या मोहिमेत निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, एसडीओ मोहिते, तहसीलदार पवार, नायब तहसीलदार डाबेराव, माना पोलीस स्टेशनचे पी.आय. खंडारे, एंडलीचे तलाठी हे लक्ष ठेवून होते.

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर