शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

दहा दिवसांपासून बेपत्ता युवकाचा मृतदेहच आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 13:48 IST

सदर युवकाच्या मृत्यूचे कारण अद्यापही गुलदस्त्यात असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

अकोला: वल्लभनगर येथील रहिवासी जॉन धांदे हा गत १० दिवसांपासून बेपत्ता झाल्यानंतर या युवकाचा मृतदेहच हिंगणा तामसवाडीजवळील पूर्णा नदीपात्रात मंगळवारी तरंगताना आढळला. याप्रकरणी अकोट फैल पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. सदर युवकाच्या मृत्यूचे कारण अद्यापही गुलदस्त्यात असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.वल्लभगनर येथील रहिवासी जॉन ऊर्फ प्रेमदास प्रल्हाद धांदे (२९) हा युवक गत १० दिवसांपासून बेपत्ता होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला असता कुठेही थांगपत्ता लागला नाही; मात्र १० दिवसांपाून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह पूर्णा नदीपात्रात असल्याची माहिती अकोट फैल पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश अणे यांना मिळाली. यावरून त्यांनी हिंगणा तामसीवाडी परिसरात पूर्णा नदीमधून मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. यावेळी केलेल्या तपासणीत आढळून आले की, नदीपात्रात आढळलेला मृतदेह हा जॉन प्रेमदास धांडे याचा असून, तो मागील १० आॅक्टोबरपासून बेपत्ता होता. मृतकाची बेपत्ता असल्याची तक्रारही पोलीस ठाण्यात दाखल आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी