शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 11:29 IST

प्रामुख्याने निगेटिव्ह रक्तगटाची चणचण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.

अकोला : राज्यभरातील रक्तपेढ्यांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, जवळपास सर्वच रक्तगटाचा तुटवडा आहे. बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा उपलब्ध नसल्याने थॅलेसिमियासह इतर गंभीर आजाराच्या रुग्णांना रक्त मिळण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. रक्तदानासाठी रक्तदाते तयार होत नसल्याने निगेटिव्ह रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असताना त्याचा थेट परिणाम रक्तसंकलनावर दिसून आला. मे, जून आणि जुलै महिन्यात बहुतांश ठिकाणी रक्तदान शिबिरे झालीच नसल्याने रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवू लागला. त्याचा सर्वाधिक फटका थॅलेसिमियासह इतर रक्ताशी निगडित रुग्णांना बसला आहे. या रुग्णांना नियमित रक्ताची गरज भासते; मात्र रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा उपलब्धच नसल्याने अशा रुग्णांची मोठी पंचाईत झाली आहे. प्रामुख्याने निगेटिव्ह रक्तगटाची चणचण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.या रक्तगटाची उपलब्धता शून्य!गत चार ते पाच महिन्यात जवळपास सर्वच रक्तगटांचा तुटवडा जाणवत आहेत; मात्र निगेटिव्ह रक्तगटाचा विचार केल्यास रक्तपेढ्यांमध्ये शून्य उपलब्धता असल्याने निदर्शनास येते. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, राज्यभरातील बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये ए-, बी-, ओ-, एबी- या निगेटिव्ह रक्तगटाची उपलब्धता शून्य दिसून येते.रक्तसंकलनाला कोरोनाचा फटका बसला आहे. रक्तसंकलन वाढविण्यासाठी नियमांचे पालन करून शिबिरे घेण्यात येत आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून रक्तदात्यांची विशेष काळजी घेतली जात आहे.- डॉ. श्रीराम चोपडे, विभाग प्रमुख, शासकीय रक्तपेढी, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाBlood Bankरक्तपेढी