शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
3
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!
4
India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाला! भारताच्या कारवाईदरम्यान मोठा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
5
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
6
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
7
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
8
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
9
Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
10
Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!
11
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
12
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
13
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
14
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
16
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
17
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
18
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
19
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
20
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त

रक्ताची नाती जपणारा कार्यकर्ता..

By admin | Updated: December 9, 2015 02:51 IST

मोफत रक्तगट तपासणी करून रक्तदान चळवळ रुजविण्याचा प्रयत्न.

अकोला: रक्तगटाचा शोध लागून शतक उलटले तरी.. समाजातील ८0 टक्के लोकांना त्यांचा रक्तगट माहीत नाही. रक्तदान आणि रक्तगट तपासणीविषयी समाजात अद्यापही गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करून, रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्याचे काम आणि रक्ताची नाती निर्माण करण्याचे काम एक कार्यकर्ता करतो आहे, तो आहे, डॉ. राम बालकिशन मंत्री. शाळा, महाविद्यालये, गावोगावी फिरून मोफत रक्तगट तपासणी शिबिरांच्या माध्यमातून रक्तदान चळवळ जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न डॉ. राम गत अनेक वर्षांंपासून करताहेत. राम मंत्री हे १५, २0 वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात काम करतात. ८ वर्ष शासकीय सेवेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणूनही त्यांनी काम केले. दरम्यान, त्यांना ग्रामीण भागाशी जवळचा संबंध आला. अनेकांना रक्तगट माहिती नसल्याने त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले, अपघात झाला, आजार झाला आणि रक्त देण्याची गरज पडली; परंतु रक्तगटच माहीत नसल्याने, रुग्णाची व नातेवाइकांची होणारी विचलता, त्यांनी अनुभवली आणि रक्तदानाविषयीचे ग्रामीण भागात असलेले गैरसमजसुद्धा त्यांच्या लक्षात आले. पुढे त्यांनी शासकीय नोकरी सोडून स्वत:ची लॅब सुरू केली आणि डॉ. हिरालाल मंत्री स्मृती आरोग्य मित्र परिवाराची स्थापना केली. यातून त्यांनी स्वैच्छिक रक्तगट तपासणी चळवळ उभी करण्यासाठी प्रयत्न सुरू केला. प्रत्येक व्यक्तीला रक्तगट माहिती व्हावा आणि त्याचे रक्तगट कार्ड त्याच्याकडे असावे आणि त्यातून स्वैच्छिक रक्तदाते तयार व्हावेत, या उदात्त हेतूने डॉ. राम मंत्री यांनी शाळा, महाविद्यालयांसोबतच गावागावांमध्ये जाऊन रक्तगट तपासणी शिबिरे आयोजित केली. एवढेच नाही तर रक्तगटासोबतच रक्तदानाचे महत्त्वही पटवून दिले आणि रक्तगट तपासणीनंतर मोफत लाइफटाइम कार्ड उपलब्ध करून दिले. गत ७, ८ वर्षांंमध्ये पश्‍चिम विदर्भात ५0 हजारांच्या जवळपास व्यक्तींचे मोफत रक्तगट त्यांनी तपासून दिले आहेत. डॉ. राम मंत्री यांनी केलेले कार्य समाजासाठी एक प्रेरणावाट आहे.