शिबिराचे अध्यक्ष म्हणून संस्थाध्यक्ष नवनीत लखोटीया, उपाध्यक्ष लुणकरण डागा, सचिव प्रमोद चांडक, कोषाध्यक्षा रेखा चांडक, सदस्या शारदा लखोटीया, सुधा डागा, प्राचार्य विजय बिहाडे, पत्रकार विजय शिंदे, डॉ.रमेश देशपांडे, डॉ.समीर देशमुख, हिवरखेड प्राचार्य चंद्रकांत तिवारी, ममता श्रावगी, प्रभुदास नाथे, अमर ठाकूर, रिंकू अग्रवाल, जयश्री बिहाडे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी प्राचार्य विजय बिहाडे यांनी ‘लोकमत’च्या उपक्रम व संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त यशोगाथा मांडली. त्यानंतर, संस्थाध्यक्ष नवनीत लखोटीया, प्राचार्य चंद्रकांत तिवारी, विजय शिंदे, रमेश देशपांडे यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगितले. यासोबत शिक्षक योगेश्वर कुलट यांनी संस्थेवर रचलेली कविता सादर केली. या शिबिरामध्ये संस्थेच्या कोषाध्यक्षा रेखा चांडक यांनी, तसेच पालक प्रतिनिधीमधून रवींद्र पुंडकर, सपना भारसाकळे, सुधीर ठाकरे, डॉ.अनिल हजारे, बबिता हजारे, प्रवीण महल्ले, प्रवीण वाघ, नितीन कोल्हे, शशिकांत दही, मोहम्मद आतिक, प्रवीण सोळंके, कोमल छलीवाल, अनिल रोकडे, नितीन गावंडे, अभिलाष निचळ यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यावेळी तब्बल ४१ रक्तदाते यांनी सहभागी झाले होते. रक्त संकलनाकरिता डॉ.हेडगेवार रक्तपेढी प्रमुख डॉ.समीर देशमुख, व्यवस्थापक रमेश देशपांडे, युवराज खोडके, प्रसन्न जोशी, संतोष अंधारे, आशा कडू, पत्रकार वसीम खान, पत्रकार विनोद कोनप्ते, समाजसेवक योगेश वाकोडे, लकी इंगळे, धिरज कळसाईत यांनी सहकार्य केले. संचालन यामिनी पाटील, तर आभार प्रदर्शन स्वाती कुरळकर यांनी केले. या कार्यक्रमाकरिता लोकमत समूह, सेंट पॉल्स अकॅडमी अकोट व हिवरखेड शिक्षकवृंद कर्मचारी, तसेच डॉ.हेडगेवार रक्तपेढी अकोला या संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
अकोटात रक्तदान महायज्ञात ४१ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:13 IST