शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

डॉलर, पाउण्ड, यूरोचा ब्रोकरकडून काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 12:47 IST

राष्ट्रीयीकृत बँकेतील नाकर्तेपणाचा गैरफायदा अकोल्यातील ब्रोकर्स घेत असून, त्यात त्यांची मनमर्जी सुरू आहे. विदेशी चलनाच्या नावाखाली होत असलेली ही लूट जिल्हा प्रशासनाने थांबवावी, अशी मागणी होत आहे.

- संजय खांडेकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदेश यात्रा करणाऱ्या प्रवाशांना सुविधा असावी म्हणून राष्ट्रीयीकृत बँक आणि अधिकृत ब्रोकरकडूनच चलन घेतले पाहिजे, असे म्हटले जाते; मात्र राष्ट्रीयीकृत बँक आणि अधिकृत ब्रोकर्सकडे डॉलर, पाउण्ड आणि यूरोचे विदेशी चलन नाही; मात्र जिल्ह्यातील अनधिकृत असलेल्या दलालांकडे मुबलक पाहिजे तेवढा साठा आहे. त्यामुळे विदेश यात्रा करणाऱ्यांना पर्यायाने अव्वाच्या सव्वा कमिशनचे दर देऊन विदेश चलन घ्यावे लागत आहे.अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातून विदेशागमन करणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्या तुलनेत विदेशी चलन मिळण्याची व्यवस्था मात्र नाही. भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतील सहा नंबर काउंटरवर विदेशी चलन सुविधा केंद्र आहे; मात्र येथे डॉलर, पाउण्ड आणि यूरोचे विदेशी कोणतेही चलन नाही. अकोल्यातील इतर राष्ट्रीयीकृत बँकेत तर अशा प्रकारची सेवादेखील नाही. एकीकडे हे चित्र असले तरी अकोल्यातील ब्रोकर्स यांच्याकडे मात्र डॉलर, पाउण्ड आणि यूरोचे विदेशी चलन मोठ्या प्रमाणात आहे.राष्ट्रीयीकृत बँकेतील नाकर्तेपणाचा गैरफायदा अकोल्यातील ब्रोकर्स घेत असून, त्यात त्यांची मनमर्जी सुरू आहे. विदेशी चलनाच्या नावाखाली होत असलेली ही लूट जिल्हा प्रशासनाने थांबवावी, अशी मागणी होत आहे.

डागाळलेले डॉलर्स चालेनाभारतीय स्टेट बँकेत भारतीय किमतीचे जवळपास अडीच लाख रुपयांचे विदेशी चलनातील डॉलर्स पडून आहेत. या सर्व डॉलर्सवर कुंकवाचे, पेनाने लिहिल्याच्या खानाखुणा आहेत. डागाळलेले चलन असल्याने सदर डॉलर्स नाकारण्यात आले. त्यामुळे ते बँकेत अनेक महिन्यांपासून पडून आहेत. वºहाडातील शेगाव येथून सर्वात जास्त विदेशी चलनाचे व्यवहार होत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

बाजारदरापेक्षा जास्त दराने उलाढालविदेशी चलन मिळविण्यासाठी विदेशात जात असलेल्या ठिकाणाचे विमान तिकीट आणि पासपोर्ट अनिवार्य असते; मात्र या दोन्ही दस्तऐवजांशिवाय डॉलर, पाउण्ड आणि यूरोचे विदेशी चलन अकोल्यात सर्रास मिळत आहे. कोणत्याही दस्तऐवजाशिवाय विदेशी चलन मिळवून दिल्या जात असल्याने आजच्या बाजारदरापेक्षा महागात ते दिले जात आहे.

टॅग्स :Akolaअकोलाbankबँक