शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

भाजपमध्ये ‘भूमिगत’ काथ्याकूट; योजनेवर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:27 IST

भूमिगत गटार योजनेच्या निविदेवर असंख्य प्रश्न उपस्थित करून प्रशासनाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभा करणार्‍या महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला अवघ्या चार दिवसांत उपरती झाली. ३0 सप्टेंबरपर्यंत प्रकल्पाची वर्कऑर्डर न दिल्यास योजनेसाठी मंजूर केलेला निधी इतर शहरांसाठी वापरण्याचे शासनाचे धमकीवजा इशारा पत्र प्राप्त होताच सोमवारी दिवसभर भाजपमध्ये ‘भूमिगत’ काथ्याकूट सुरू होते. अखेर लोकप्रतिनिधींच्या बैठकीत योजनेवर शिक्कामोर्तब करून, २२ सप्टेंबर रोजी स्थायी समितीची सभा आयोजित केली जाणार असल्याची माहिती आहे. 

ठळक मुद्देशासनाच्या पत्रामुळे सत्ताधार्‍यांना उपरतीशुक्रवारी पुन्हा सभा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भूमिगत गटार योजनेच्या निविदेवर असंख्य प्रश्न उपस्थित करून प्रशासनाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभा करणार्‍या महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला अवघ्या चार दिवसांत उपरती झाली. ३0 सप्टेंबरपर्यंत प्रकल्पाची वर्कऑर्डर न दिल्यास योजनेसाठी मंजूर केलेला निधी इतर शहरांसाठी वापरण्याचे शासनाचे धमकीवजा इशारा पत्र प्राप्त होताच सोमवारी दिवसभर भाजपमध्ये ‘भूमिगत’ काथ्याकूट सुरू होते. अखेर लोकप्रतिनिधींच्या बैठकीत योजनेवर शिक्कामोर्तब करून, २२ सप्टेंबर रोजी स्थायी समितीची सभा आयोजित केली जाणार असल्याची माहिती आहे. केंद्र शासनाच्या ‘अमृत’योजनेंतर्गत शहरातील सांडपाण्याचा निचरा करून त्यावर पुनप्र्रक्रिया करण्यासाठी भूमिगत गटार योजना मंजूर करण्यात आली. त्यासाठी ७९ कोटींची तरतूद केल्यामुळे महापालिकेने पहिल्या टप्प्यातील कामासाठी ६१ कोटींची निविदा प्रकाशित केली. ईगल इन्फ्रा लिमिटेड कंपनी ठाणे यांच्यावतीने ८.९१ टक्के जादा दराची निविदा तसेच विश्‍वराज इन्फ्रा कंपनी नागपूरच्यावतीने ७२ टक्के जादा दराची निविदा प्राप्त झाली होती. प्रशासनाने ईगल इन्फ्रा लिमिटेडच्या निविदेला अंतिम मंजुरीसाठी स्थायी समितीकडे सादर केले. योजनेसाठी मजीप्राने तयार केलेल्या प्रकल्प अहवालात (डीपीआर) असंख्य तांत्रिक चुका असल्याचे नमुद करीत १३ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या मनपाच्या स्थायी समितीच्या सभेत भूमिगतसाठी फेरनिविदा प्रक्रिया राबवण्याची मागणी खुद्द भाजपाच्या नगरसेवकांनी लावून धरली. नगरसेवकांच्या प्रश्नांना प्रशासकीय अधिकारी समाधानकारक उत्तर न देऊ शकल्यामुळे स्थायी समितीने फे रनिविदा काढण्याचे निर्देश जारी केले. हा निर्णय घेऊन अवघे चार दिवस होत नाहीत, तोच शासनाचे धमकी वजा इशारा देणारे पत्र प्राप्त होताच भाजपाने ‘यू टर्न’ घेत योजनेवर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. 

..अन्यथा निधी परत जाणार!स्थायी समिती सभेने ‘भूमिगत’साठी फेरनिविदा काढण्याचे निर्देश देताच, चार दिवसांत शासनाने पत्र जारी केले. ३0 सप्टेंबरपर्यंत प्रकल्पाचा कार्यादेश देण्याबाबत मनपाने निर्णय न घेतल्यास योजनेची प्रशासकीय मान्यता रद्द करून, निधी इतर शहरांसाठी वळती करण्याचा खणखणीत इशारा देण्यात आला. ‘अमृत’योजनेंतर्गत हा निधी २0१८-१९ या आर्थिक वर्षातही प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे या निविदेला कार्यादेश देण्यासाठी शासनाची एवढी घाई का आणि शासनाच्या पत्रामुळे सत्तेतील पदाधिकारी खरोखरच दबावात येऊ शकतात का, असा सवाल उपस्थित होतो.

लोकप्रतिनिधींच्या बैठकीत गुफ्तगू!महापालिकेत भाजप पदाधिकार्‍यांमध्ये दिवसभर खलबते सुरू होती. दुपारी स्थानिक विश्रामगृह येथे तातडीची बैठक पार पडली. खा. संजय धोत्रे, आ. रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महापौर विजय अग्रवाल, स्थायी समिती सभापती बाळ टाले, डॉ.किशोर मालोकार यांच्यात गुफ्तगू झाल्यानंतर योजनेची फेरनिविदा न काढता ‘त्या’च कंपनीला कार्यादेश देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.