शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता राेकाे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 17:55 IST

BJP's Agitation for OBC reservation on national highway : शनिवारी सकाळी शिवर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर भाजपच्यावतीने रास्ता राेकार करण्यात आला.

अकोला: आघाडी सरकारच्‍या हलगर्जीपणामुळे सर्वाेच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्दबातल केले. ओबीसी समाजाला न्‍याय मिळवून देइपर्यंत भाजपचा लढा सुरू राहणार असून यानंतर तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे जिल्हाध्‍यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांनी दिला. शनिवारी सकाळी शिवर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर भाजपच्यावतीने रास्ता राेकार करण्यात आला. यावेळी ते बाेलत हाेते. रास्ता राेेकाेमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या हाेत्या. यावेळी पाेलिसांनी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते ताब्यात घेतले.सर्वाेच्च न्यायालयात याेग्य भूमिका मांडण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आल्यामुळेच न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केले. अशास्थितीत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. ओबीसी समाजाला न्याय मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नये अशी भूमिका घेत भारतीय जनता पक्षाच्यावतीने आंदाेलनाचा बिगुल फुंकण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री संजय भाऊ धोत्रे यांच्या आदेशानुसार शनिवारी जिल्हाभरात ओबीसी समाजाच्या समर्थनात भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आ. रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर रास्ता राेकाे आंदाेलन करण्यात आले. यावेळी आ.गाेवर्धन शर्मा, तेजराव थाेरात, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, महापाैर अर्चना मसने, राहुल इंगळे, श्रावण इंगळे, रवि गावंडे, राजेश बेले, रावसाहेब कांबे, किशोर मांगटे पाटील, गितांजली शेगोकार, वैशाली शेळके, याेगिता पावसाळे, सुमन गावंडे, रश्मी अवचार, संजय बडोणे, चंदा शर्मा, निलेश निनोरे, माधव मानकर, संजय जिरापुरे, अक्षय गंगाखेडकर, डॉ. विनोद बोर्डे, गणेश पावसाळे, सिध्‍दार्थ शर्मा, अनिल मुरूमकार, प्रशांत अवचार, रंजना विंचनकर, विजय इंगळे, जान्‍हवी डोंगरे, डॉ.शंकरराव वाकोडे, हरिष आलिमचंदानी, अनिल गरड, हरिभाऊ काळे, मंगला सोनोने, आरती घोगलीया, शारदा खेडकर, उमा साहू, साधना येवले, शकुंतला जाधव, दिपाली जगताप, विशाल इंगळे, सतिष ढगे, बाळ टाले यांसह असंख्य कार्यकर्ते सहभागी होते.

टॅग्स :PoliticsराजकारणAkolaअकोलाBJPभाजपाOBC Reservationओबीसी आरक्षण