शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी आंदोलन: भाजपा नेते यशवंत सिन्हा यांना अकोल्यात अटक

By atul.jaiswal | Updated: December 4, 2017 22:15 IST

अकोला : शेतकऱ्यांच्या  मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाद्वारे आयोजित ‘कासोधा’ परिषदेत सहभागी झाल्यानंतर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी ठिय्या देणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा व त्यांच्या सहकाºयांना अकोला पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास अटक केली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या  मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिला होता ठिय्यारविकांत तुपकर व शेकडो शेतकºयांनाही घेतले ताब्यात

अकोला : शेतकऱ्यांच्या  मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाद्वारे आयोजित ‘कासोधा’ परिषदेत सहभागी झाल्यानंतर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी ठिय्या देणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा व त्यांच्या सहकाºयांना अकोला पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास अटक केली. शेतकऱ्यांच्या होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच शेतकºयांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधन्यासाठी शेतकरी जागर मंचाने सरकारविरुद्ध एल्गार पुकारला असून, या आंदोलनाअंतर्गत जिल्हाभरातील शेतकºयांनी सोमवारी माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले होते. प्रशासनाने आमच्यापर्यंत येऊन आमचे म्हणने ऐकून घ्यावे, अशी भूमिका आंदोलक शेतकºयांनी घेतल्या नंतर  जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आंदोलकांना भेट देऊन त्यांचे म्हणने ऐकुन घेतले. या बोलणीदरम्यान आंदोलकांचे समाधान झाले नाही.  पुढील एक तासात प्रशासनाने शेतकºयांच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढला नाही, तर शेतकरी काहीही करण्यास मोकळे आहेत, असा ‘अल्टिमेटम’ यशवंत सिन्हा यांनी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांना दिला होता. तासाभरात प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झाली नाही. त्यामुळे आंदोलकांनी पुन्हा जिल्हाधिकाºयांना भेटण्याची गळ घातली; परंतु जिल्हाधिकाºयांनी भेटण्यास मनाई केली. त्यानंतर  पोलिसांनी यशवंत सिन्हा, शेतकरी जागर मंचाचे संयोजक जगदीश मुरूमकार , शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, शंकरअण्णा धोंडगे, तात्या कृपाळ, सुरेश रामगुंडे, गजानन अमदाबादकर, प्रशांत गावंडे यांच्यासह आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांना अकोला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले.

 नाफेडचे उडीद, मूग, सोयाबीन व तूर विक्रीसाठी असलेले क्लिष्ट नियम बदलून, शेतकºयांचा शेतमाल हमीभावाने विकत घ्यावा, आर्थिक अडचणीतून शेतकºयाला बाहेर काढण्यासाठी शासनाने सर्व शेतमालासाठी भावांतराची योजना लागू करावी. कपाशीवरील बोंडअळीचा सर्व्हे करून नुकसानग्रस्त शेतकºयांना एकरी ५0 हजार नुकसान भरपाई द्यावी, शेतकºयांना व्याज व दंडासह आकारलेल्या अवाजवी वीज देयक पाठविले आणि वीज तोडणी सुरू केली. हे थांबवून शेतकºयांना दिलासा द्यावा, पीक विमा तातडीने देण्यात यावा आणि त्यावर तोडगा काढावा, अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून, दुष्काळी अनुदान द्यावे, सोनेतारण कर्जमाफीपासून वंचित ३५ हजार शेतकºयांना न्याय द्यावा, कर्जमाफी फसवी असल्यामुळे या योजनेला दिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बदलावे आणि शेतकºयांच्या मुलांची तीन वर्षांपासून थकीत शिष्यवृत्ती द्यावी या मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाने आंदोलन छेडले आहे.