शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
2
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
3
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
5
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
6
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
7
Fact Check: राहुल गांधींच्या हातातील 'ते' लाल रंगाचं संविधान चीनचं नाही; व्हायरल दावा चुकीचा
8
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
9
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
10
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
11
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
12
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
13
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
14
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
15
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
16
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
17
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
18
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
19
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
20
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल

जैविक घटक ट्रायकोग्रामाचे उत्पादन वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 1:47 PM

-  राजरत्न सिरसाटअकोला : पर्यावरण प्रदूषण कमी करण्याकरिता, विषारी रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करू न शेतकऱ्यांना ग्रामीण स्तरावर रोजगार निर्मितीच्या दृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा च्या कीटकशास्त्र विभागाच्यावतीने जैविक कीड नियंत्रण घटक उत्पादन वाढीवर भर दिला असून, या घटकाच्या उत्पादनासाठी मागील चार वर्षांत विदर्भातील ९०० शेतकऱ्यांना नि:शुल्क प्रशिक्षण देण्यात ...

ठळक मुद्देपरभक्षी जैविक घटकांचे उत्पादन व हे जैविक कीड नियंत्रक वापरण्यासंबंधी विदर्भातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. जैविक घटकांच्या माध्यमातून कीड व्यवस्थापन करणे अत्यंत सोपे, सरळ व कमी खर्चाचे असल्याचे शेतकºयांना या प्रशिक्षणाद्वारे समजावून सांगण्यात आले.

-  राजरत्न सिरसाटअकोला : पर्यावरण प्रदूषण कमी करण्याकरिता, विषारी रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करू न शेतकऱ्यांना ग्रामीण स्तरावर रोजगार निर्मितीच्या दृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाच्यावतीने जैविक कीड नियंत्रण घटक उत्पादन वाढीवर भर दिला असून, या घटकाच्या उत्पादनासाठी मागील चार वर्षांत विदर्भातील ९०० शेतकऱ्यांना नि:शुल्क प्रशिक्षण देण्यात आले.खरीप, रब्बी पिकांवर अनेक नवीन किडींचा प्रादुर्भाव अलीकडे वाढला असून, यातील घाटेअळी विषाणू, ट्रायकोग्रामा परोपजीवी कीटक व क्रायसोपा व ढाल या परभक्षी जैविक घटकांचे उत्पादन व हे जैविक कीड नियंत्रक वापरण्यासंबंधी विदर्भातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. २०१४-१५ पासून या प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली होती. आतापर्यंत ३७ च्यावर शेतकरी गटांना प्रशिक्षण देण्यात आले.विदर्भातील तूर, कापूस, हरभरा, सोयाबीन व भाजीपाला पिकांवरील किडींचे जैविक पद्धतीने व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने घाटेअळी विषाणू, ट्रायकोग्रामा परोपजीवी कीटक तसेच क्रायसोपा या परभक्ष्यी कीटकांची प्रयोगशाळेत निर्मिती व त्यांचा पिकामध्ये वापर व इतर इत्थंभूत माहिती प्रत्यक्ष उत्पादन तंत्राच्या अनुभवातून शेतकºयांना या प्रशिक्षणात देण्यात आली. किडींची अंडी व सुरुवातीच्या अळी अवस्थेतच किडींचा समूळ नायनाट करण्याकरिता व दीर्घकाळ प्रभावी अशा जैविक घटकांच्या माध्यमातून कीड व्यवस्थापन करणे अत्यंत सोपे, सरळ व कमी खर्चाचे असल्याचे शेतकºयांना या प्रशिक्षणाद्वारे समजावून सांगण्यात आले. यासाठी विभागीय कृषी सहसंचालक व जिल्हा आत्मा संस्थेच्या सहयोगाने हे मोफत प्रशिक्षण डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठात देण्यात आले.

- स्वयंरोजगार होणार उपलब्ध!जैविक घटकांचे उत्पादन हे जैविक कीड नियंत्रण करण्यासाठी असून, स्वयंरोजगारासाठी हे उत्तम साधन आहे. या जैविक घटकांचे उत्पादन करू न बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या उत्पन्न प्राप्त करू शकतात. याचे उत्पादन करणे सोपे असून, घरी, गाव स्तरावरसुद्धा उत्पादन घेता येते.- रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करू न जैविक घटकांचा शेतात वापर करू न भरघोस उत्पादन घेण्यासाठी विदर्भात ३७ प्रशिक्षण घेण्यात आले असून, ९०० शेतकºयांना प्रशिक्षण दिले आहे. प्रशिक्षित शेतकºयांनी याचा लाभ घेण्याची गरज आहे.- डॉ. धनराज उंदिरवाडे, विभाग प्रमुख,कीटकशास्त्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ