शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिलाला मिळाला नवा चेहरा!

By admin | Updated: March 27, 2017 02:47 IST

क्यूआर कोडची जोड; मोबाइल अँप डाउनलोड करणे झाले सोपे.

अकोला, दि. २६- महावितरणने वीज बिलाला आता नवा चेहरा दिला असून, सुटसुटीत माहितीसह मोबाइल अँप थेट डाउनलोड करण्यासाठी या बिलामध्ये ह्यक्यूआरह्ण कोड उपलब्ध करून देण्यात आला आहे. महावितरणचे नव्या स्वरुपातील वीज बिल ग्राहकांना वितरित करण्यात येत आहे. जुन्या वीज बिलाच्या तुलनेत ते अधिक सुटसुटीत असून, त्याची रंगसंगती आकर्षक करण्यात आली आहे. या वीज बिलात असलेल्या क्यूआर कोडद्वारे वीज ग्राहकांच्या सेवेसाठी असलेले महावितरणचे मोबाइल अँप डाउनलोड करता येत आहे. मोबाइलधारकांनी स्मार्टफोनमध्ये असलेल्या किंवा डाउनलोड केलेल्या क्यूआर कोड रिडरच्या माध्यमातून महावितरणच्या वीज बिलावरील क्यूआर कोड स्कॅन केला की थेट महावितरण मोबाइल अँपची लिंक उपलब्ध होत आहे. त्याद्वारे हे अँप डाउनलोड करता येणे शक्य झाले आहे.विशेष म्हणजे वीज बिलावरील क्यूआर कोड हा अँन्ड्राइड, विंडोज व आयओएस या ऑपरेटिंग सिस्टमवर उपलब्ध आहे. महावितरणने विविध ग्राहकसेवा मोबाइल अँपच्या माध्यमातून एका क्लिकवर उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या अँपला चांगला प्रतिसाद लाभत आहे. राज्यात ११ लाखांपेक्षा अधिक ग्राहकांनी हे अँप डाउनलोड केले आहे. मीटर रिडिंग न घेतलेल्या वीज जोडण्यांच्या ग्राहकांना देयके तयार करण्यापूर्वी एसएमएसद्वारे लिंक पाठविण्यात येत असून, संबंधित ग्राहकांना त्यांच्या मोबाइल अँपद्वारे मीटर रिडिंग घेऊन ते महावितरणकडे पाठविण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच महावितरणच्या सेवेबाबत वीज ग्राहकांना आपला अभिप्रायदेखील या माध्यमातून नोंदविता येईल.