शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हय़ात व्यवसाय कर न भरताच वीटभट्टय़ा सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 02:10 IST

अकोला : मातीचे स्वामित्वधन बुडवणे, पर्यावरणाला घातक प्रदूषण करणार्‍या वीटभट्टी चालकांकडून व्यवसाय करही भरला जात नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, त्यांना कोणताही परवाना देण्यापूर्वी व्यवसाय कर भरल्याचे नाहरकत प्रमाणपत्र अनिवार्य असल्याची अट असतानाही त्याकडे महसूल अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याचे पुढे येत आहे. 

ठळक मुद्देनाहरकत प्रमाणपत्र घेण्यातही महसूल विभागाची सूट

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मातीचे स्वामित्वधन बुडवणे, पर्यावरणाला घातक प्रदूषण करणार्‍या वीटभट्टी चालकांकडून व्यवसाय करही भरला जात नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, त्यांना कोणताही परवाना देण्यापूर्वी व्यवसाय कर भरल्याचे नाहरकत प्रमाणपत्र अनिवार्य असल्याची अट असतानाही त्याकडे महसूल अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याचे पुढे येत आहे. जिल्ह्यात प्रदूषणकारी वीटभट्टय़ा सर्वत्र मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश नुकतेच जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. त्याचवेळी वीटभट्टीधारकांनी इतरही मोठय़ा प्रमाणात अनियमितता करून शासनाच्या कोट्यवधींच्या महसुलाचे तर पर्यावरणाची अपरिमित हानी करण्याचे प्रताप सुरूच ठेवले आहेत. महसूल अधिकार्‍यांनी हेतूपुरस्परपणे या घोळाकडे दुर्लक्ष केलेले आहे. त्याबाबतच्या तक्रारी असतानाही कोणतीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे आता एकाचवेळी विविध कारवाईच्या कचाट्यात वीटभट्टीधारक अडकणार आहेत. विक्रीकर विभागाने नोव्हेंबर २0१४ मध्ये जिल्हाधिकार्‍यांना पत्र देत वीटभट्टीधारकांनी महसूल विभागाकडे कोणताही अर्ज केल्यास त्यानुसार परवाना देताना विक्रीकर विभागाचा व्यवसाय कर भरल्याचे नाहरकत प्रमाणपत्र अनिवार्य करण्याची मागणी केली होती. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी १ जानेवारी २0१५ रोजी सर्व तहसीलदारांना पत्र देत शासनाच्या व्यवसाय कराचे नुकसान टाळण्यासाठी विक्रीकर विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचे बजावले. व्यवसायकर भरण्यासाठी वीटभट्टीधारकांना कायद्यानुसार नोंदणी करणे बंधनकारक आहे. मात्र, विक्रीकर विभाग, जिल्हाधिकार्‍यांच्या पत्रानंतरही वीटभट्टीधारकांकडून विक्रीकर भरण्यासाठी कानाडोळा करण्यात आला. परिणामी, विक्रीकर विभागात वीटभट्टीधारकांची नोंदच झाली नाही. त्यामुळे व्यवसाय कर भरण्यालाही फाटा देण्यात आला. त्याचवेळी जिल्ह्यात सुरू असलेल्या वीटभट्टीधारकांना माती खोदणे, वाहतूक करण्याचे परवाने असल्याने त्यांनी व्यवसाय सुरू केले. ते परवाने विक्रीकर विभागाच्या नाहरकत प्रमाणपत्राशिवाय कसे देण्यात आले, हा मुद्दा आता पुढे येत आहे. एकूणच विक्रीकर विभागाच्या नाहरकत प्रमाणपत्राच्या अनिवार्यतेकडे वीटभट्टीधारकांसोबतच महसूल अधिकार्‍यांनीही तेवढेच दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यात वीटभट्टीधारकांकडून बिनबोभाटपणे शासनाचा महसूल बुडवला जात आहे. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीण