शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

बियाणी चौक ते शिवाजी पार्क काँक्रिटीकरण सहा महिन्यांत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 01:56 IST

अकोला : शहराच्या बाजारपेठेतील अत्यंत वर्दळीचा भाग असलेल्या बियाणी चौक ते शिवाजी पार्क काँक्रिटीकरण मार्गाचे बांधकाम इतर मार्गांसारखे रेंगाळणार नाही, ते सहा महिन्यांच्या आत गतीने पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही  सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.  दैनंदिन वाहतूक आणि दररोज नव्याने उद्भवणार्‍या समस्यांमधून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदार काय मार्ग काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.  

ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाची ग्वाही व्यापार्‍यांसह नागरिक त्रस्त 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहराच्या बाजारपेठेतील अत्यंत वर्दळीचा भाग असलेल्या बियाणी चौक ते शिवाजी पार्क काँक्रिटीकरण मार्गाचे बांधकाम इतर मार्गांसारखे रेंगाळणार नाही, ते सहा महिन्यांच्या आत गतीने पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही  सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.  दैनंदिन वाहतूक आणि दररोज नव्याने उद्भवणार्‍या समस्यांमधून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदार काय मार्ग काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.  सिटी कोतवाली ते बियाणी चौक मार्गाच्या लहान अंतराच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे बांधकाम गेल्या एका वर्षापासून सुरू आहे. सातत्याने रेंगाळत असलेल्या या मार्ग बांधकामामुळे मार्गाच्या दोन्हीकडील दुकानदार अक्षरश: त्रासलेत. या बांधकामामुळे नागरिकांनी या मार्गावरील दुकानातून खरेदी करणे सोडले होते. त्यामुळे या मार्गावरील दुकानदारांचे एका वर्षात लाखो रुपयांचे नुकसान झाले. अजूनही नागरिकांच्या वापरात हा मार्ग आलेला नाही. या मार्गाचे लोकार्पण होण्याआधीच अकोला सार्वजनिक विभागाच्यावतीने या मार्गाच्या दुसर्‍या टप्प्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे या मार्गावरील पुढील वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. बियाणीचौक ते शिवाजी पार्क मार्गावरील वाहतूक तात्पुरता ‘बीएसएनएल’ कार्यालयासमोरू न डीआयसी समोरून, अलंकार मार्केटच्या मागील बाजूने, त्रिवेणीश्‍वर मंदिरापर्यंत वळविण्यात आली आहे. त्यामुळे बियाणी चौक ते त्रिवेणीश्‍वर मंदिरापर्यंतचे दुकानदारांना आता चिंता लागली आहे. जर मार्ग बांधकाम संथ गतीने होत राहिले, तर या मार्गावरील दुकानदारांनादेखील लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागणार आहे. दरम्यान, येथील व्यावसायिकांनी लोकप्रतिनिधींना गळ घालून मार्गाचे बांधकाम तातडीने करण्याची विनंती केली आहे. लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक बांधकाम विभागाला हे काम तातडीने करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे येत्या सहा महिन्यांच्या आत या काँक्रिट मार्गाचे बांधकाम पूर्ण करण्याचा दावा केला जातो आहे; पण या मार्गावरील इलेक्ट्रिक, टेलिफोनचे पोल शिफ्टिंग करणे, खोदकाम करीत खडीकरण करण्याचे काम सोपे नाही. यातून सहा महिन्यांत काँक्रिट मार्गाची निर्मिती करणे आव्हान ठरत आहे.

सिटी कोतवाली ते शिवाजी पार्क मार्गावर कायम वर्दळ असते. या मार्गावर बांधकाम करताना अनेक अडचणी येतात. मागील टप्प्याच्या बांधकामास उशीर झाला. आता पुढच्या टप्प्याला उशीर होणार नाही. सहा महिन्यांच्या आत शिवाजी पार्कपर्यंतच्या काँक्रिट मार्गाचे बांधकाम करण्याचे कंत्राटदारास सांगितले आहे. -मिथिलेश चव्हाण, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अकोला.

टॅग्स :Akola cityअकोला शहरCity Cotwali Chowkसिटी कोतवाली चौक