संतोष मुंढे/ वाशिम शेतकर्यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे तुरीचे पीक ह्यबड वेव्हीलह्ण नावाच्या किडींनी पोखरणे सुरू केले आहे. त्यामुळे शेतकर्यांना उत्पन्नाची हमी देणारे पीकही हातचे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.साधारणत: स्ट्रॉबेरीवर आढळणारी बड वेव्हील कीड यापूर्वी आंध्र प्रदेश आणि तामीळनाडूत तुरीच्या पिकावरही अल्पप्रमाणात आढळल्याची नोंद आहे. महाराष्ट्रातही या किडीने तुरीचे पीक पोखरण्याचे काम अनेक वर्षांपासून केले आहे. बड वेव्हीलचा धोका व त्याचे दुष्परिणाम वाशिम येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ आणि प्रभारी अधिकारी डॉ. भरत गीते यांच्या निदर्शनास आले असून, त्या पृष्ठभूमीवर यासंदर्भात कृषी तज्ज्ञांनी शेतकर्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. साधारणत: या पिकाला पाच ते सहावेळा बहर येतो. त्यामुळे पहिला बहर गळून पडला, तरी दुसरा येईल, तोही गेला तर तिसरा, चौथा किंवा पाचवा बहर येईल, या आशेवर शेतकरी विसंबून असतात; परंतु पिकाची काळजी घेतल्यानंतरही फूलगळ किंवा कळी गळण्याचे प्रमाण रोखणे का शक्य होत नाही, हे आजवर कोडेच होते. शास्त्रज्ञ गीते यांनी शेतकर्यांच्या या समस्येवर शोध मोहीम हाती घेतली. अतिसूक्ष्म रूपात तुरीच्या कळ्य़ात राहून त्या पोखरण्याचे काम ह्यबड वेव्हीलह्ण करीत असल्याचे डॉ. गीतेंना या शोध मोहिमेतून लक्षात आले. साधारणत: स्ट्रॉबेरीवर आक्रमण करणारी प्रमुख कीड म्हणून बड वेव्हीलकडे पाहिले जाते. ही कीड तुरीच्या कळय़ा आतून पोखरण्याचे काम करते. त्यामुळे कळय़ा गळून पडतात. कळय़ा व फुलगळीमागचे हे कारण स्पष्ट झाल्यानंतर, हा धोका तुरीचे पीक संपविण्यासाठी किती प्रमाणात कारणीभूत आहे, याची पाहणी करण्यात आली.सोयाबीन पीक हातचे गेल्याने शेतकर्यांना तुरीच्या पिकाकडून आशा आहेत. आता तुरीच्या पिकावरही बड वेव्हील व इतर किडींनी आक्रमण केल्याने शेतकरी पूरता गांगरून गेला आहे. स्ट्रॉबेरीवरील कीड तूर नष्ट करीत असल्याचे निदर्शनास आले असून, यावर उपाययोजना केल्यास शेतकर्यांच्या उत्पादनात येणारी घट कमी करणे शक्य असल्याचे येथील कृषी संशोधन केंद्राचे .शास्त्रज्ञ तथा प्रभारी अधिकारी डॉ. भरत गीते यांनी सांगीतले.
‘बड वेव्हील’ पोखरतेय तुरीचे पीक
By admin | Updated: October 20, 2014 23:23 IST