शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन चोरणारी मोठी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 11:16 IST

९० हजार रुपयांचे सोयाबीने चोरल्याचे जवळपास मान्य केले आहे.

अकोला : बार्शीटाकळी रोडवरील एका शेतामधून ९० हजारांचे सोयाबीन चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या एका टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी अटक केली. या टोळीमध्ये चार जणांचा समावेश असून, यामधील दोन चोरटे बाप-लेक असल्याचे समोर आले आहे. या चोरट्यांना मंगळवारी किंवा बुधवारी न्यायालयसमोर हजर करण्यात येणार आहे.बार्शीटाकळी रोडवरील सतीश भाऊराव आखरे यांच्या शेतातील सोयाबीन आॅक्टोबर २०१९ मध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केले होते. या प्रकरणी आखरे यांनी बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला होता. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ व त्यांच्या पथकाने या टोळीवर पाळत ठेवून नायगाव येथील रहिवासी शेख रफीक शेख बशीर त्याचा मुलगा शेख फारुख, शेख जफर शेख हुसेन आणि शेख निसार शेख नजीर या चार आरोपींना अटक केली. चारही आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात येत असून, त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पीक अशाच प्रकारे चोरी केल्याची माहिती समोर येत आहे; मात्र या चार चोरट्यांनी आखरे यांचे सुमारे ९० हजार रुपयांचे सोयाबीने चोरल्याचे जवळपास मान्य केले आहे. त्यामुळे या टोळीकडून शेतकºयांचे पीक चोरी केल्याच्या आणखी काही घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी