शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Big Breaking : CoronaVirus : अकोल्यात पाच नवे पॉझिटिव्ह, मृत महिलाही कोरोनाबाधीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 19:59 IST

मयत महिला ही बैदपूरा भागातील असून, अन्य चार पॉझिटिव्ह रुग्ण हे दिपक चौक भागातील आहेत.

अकोला : जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने आता अकोला शहरात हातपाय पसरण्यास सुरुवात केली असून, बुधवारी आणखी पाच नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. यामध्ये मंगळवार, २८ एप्रिल रोजी मृत्यू झालेल्या एका ४२ वर्षीय महिलेचा समावेश असून, सदर महिला ही अकोल्यातील कोरोनाचा दुसरा बळी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. मयत महिला ही बैदपूरा भागातील असून, अन्य चार पॉझिटिव्ह रुग्ण हे दिपक चौक भागातील आहेत. बुधवारअखेरपर्यंत अकोला जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २७ झाली असून, सद्यस्थितीत १६ रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन कक्षात उपचार सुरु आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजअखेर एकूण ६४९ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ६२२ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ५९५ अहवाल निगेटीव्ह २७ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व ३२ अहवाल प्रलंबित आहेत.आजपर्यंत एकूण ६४९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५२१, फेरतपासणीचे ८७ तर वैद्यकीय कर्मचा?्यांचे ४१ नमुने होते. आजपर्यंत एकूण ६२२ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४९६ तर फेरतपासणीचे ८५ व वैद्यकीय कर्मचा?्यांचे ४१ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ५९५ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल २७ आहेत.आज प्राप्त झालेल्या ३५ अहवालात ३० अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर पाच पॉझिटीव्ह आहेत. निगेटीव्ह अहवालात सिंधी कॅम्प मधील रुग्णाच्या संपकार्तील आठ जणांच्या अहवालाचाही समावेश आहे. सिंधी कॅम्प मधील रुग्णाच्या संपकार्तील ५४ जणांची तपासणी आज पर्यंत झाली असून त्यातील ५० जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. आता फक्त चार जणांचे अहवाल प्रलंबित आहेत, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने स्पष्ट केले आहे.सायंकाळी उशीरा आलेले पाचही अहवाल पॉझिटिव्हआज सायंकाळी सात वाजता प्राप्त पाच अहवालांत पाचही जण पॉझिटीव्ह आले आहेत. यात बैदपूरा भागातील महिलेचा समावेश आहे. ही महिला अत्यवस्थ अवस्थेत दि. २८ रोजी दुपारी रुग्णालयात दाखल झाली. दाखल झाल्यावर काही वेळातच तिचा मृत्यू झाला. या महिलेच्या घशातील स्त्रावाचा नमुना घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आता सायंकाळी प्राप्त झाला. तो पॉझिटीव्ह आला. त्यानंतर उर्वरित चार जणांचे अहवाल ही पॉझिटीव्ह आले. हे चौघे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. ते दीपक चौक परिसरात कलाल ची चाळ येथील रहिवासी आहेत. या कुटुंबातील एक सदस्य हा प्रशासनाने सुरु केलेल्या रेड क्रॉस संचलित फिव्हर क्लिनिक मध्ये गेला होता. तेथे त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाण्यास सांगण्यात आले. त्यानुसार ते सर्व जण आलेही. मात्र ते लगेच निघून गेले. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने मनपा, प्रांताधिकारी व पोलीस यांच्या सहाय्याने त्यांना घरून आणले. त्यांचे नमुने घेतले. आजच्या अहवालात ते चौघेही पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत वाढजिल्ह्यात आता एकूण कोवीडबाधीत रुग्णसंख्या २७ आहे. त्यात तिघे मयत आहेत. गुरुवारी (दि.२३) सात जण व सोमवारी (दि.२७) एका जणास असे आठ जण पूर्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. आजअखेर १६ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, आजपर्यंत दाखल प्रवाशी संख्या ६५५ असून २८९ गृह अलगीकरणात तर ८४ हे संस्थागत अलगीकरणात असे एकूण ३७३ अलगीकरणात आहेत. आतापर्यंत २४० जणांची गृह अलगीकरणाची १४ दिवसांची मुदत संपली आहे. तर विलगीकरणात ४१ रुग्ण दाखल आहेत. आज नव्याने तीन संदिग्ध रुग्ण दाखल झाले आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या