शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
3
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
4
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
5
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
6
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
7
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
8
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
9
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
10
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
11
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
12
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
13
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
14
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
15
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
16
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
17
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
18
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
19
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
20
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

बीएचआर सोसायटीचे अध्यक्ष, संचालकांविरुध्द गुन्हा

By admin | Updated: February 27, 2015 00:47 IST

मालेगाव येथील प्रकरण, मुदत ठेव परत देण्यास टाळाटाळ भोवली.

मालेगाव (जि. वाशिम) : येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. जळगावचे अध्यक्ष व संचालकाविरुध्द मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये २५ फेब्रुवारीला गुन्हे दाखल करण्यात आले. वाशिम येथील सिव्हील लाईन परिसरात राहणारे प्रकाश गोबरु राठोड यांनी मालेगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले की, फियार्दीने भाईचंद हिराचंद रायसोनी को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. जळगाव या पतसंस्थेच्या मालेगाव येथील शाखेत बचत खाते उघडून संजीवनी ठेव योजनेंतर्गत ३६५ दिवसांसाठी पाच लाख रुपये मुदत ठेव ठेवली होती. त्याची मुदत ३ जुलै २0१४ रोजी संपली. मुदत संपल्यानंतर ठेवीची रक्कम व्याजासह परत मागितली असता ती परत देण्यास पत संस्थेच्या कर्मचार्‍यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे २५ फेब्रुवारीला प्रकाश राठोड यांनी बी.एच.आर चे संचालकांविरुध्द संगणमत करुन विश्‍वास घात करुन फसवणुक केल्याची फिर्याद दिली.या फियार्दीवरुन पोलिसांनी संचालक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद रायसोनी, अध्यक्ष दिलीप कांतीलाल चोरडिया, उपाध्यक्ष मोतीलाल ओंकार जिरी, संचालक सुरजमल, भुरमल जैन, दादा रामचंद्र हरि पाटील, भागवत संपत माळी, राजाराम काशीनाथ कोळी, भागवत हिरामन वाघ, हितेंद्र महाजन, इंद्रकुमार लालवाणी, यशवंत ओंकार गिरी, शेख रमजान शेख अब्दुल नबी, सकुलाल सहादु माळी, माधवी कुलकर्णी, निलेश गावंडे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४0९, ४२0, १२0 ब (३),महाराष्ट्र ठेवीदार हितसंबध अधिनियम १९९९ नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. घटनेचा तपास ठाणेदार आर.एस.तट करीत आहेत.