शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मनपा सफाई कर्मचार्‍यांचे ‘भीक मांगो’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:04 IST

अकोला : चार महिन्यांच्या थकीत वेतनासह विविध मागण्यांसाठी महापालिकेच्या सफाई कामगारांनी बुधवारी शहरात ‘भीक मांगो’ आंदोलन राबवले. कर्मचार्‍यांनी महापालिका कार्यालयापासून ते मुख्य बाजारपेठेत फिरून अकोलेकरांजवळून ३ हजार १0७ रुपये जमा केले. ही रक्कम प्रशासनाला देण्याचा प्रयत्न केला असता प्रशासनाने रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. 

ठळक मुद्देअकोलेकरांजवळून जमा केले ३ हजार १0७ रुपयेरक्कम प्रशासनाला देण्याचा प्रयत्नरक्कम स्वीकारण्यास प्रशासनाने दिला नकार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : चार महिन्यांच्या थकीत वेतनासह विविध मागण्यांसाठी महापालिकेच्या सफाई कामगारांनी बुधवारी शहरात ‘भीक मांगो’ आंदोलन राबवले. कर्मचार्‍यांनी महापालिका कार्यालयापासून ते मुख्य बाजारपेठेत फिरून अकोलेकरांजवळून ३ हजार १0७ रुपये जमा केले. ही रक्कम प्रशासनाला देण्याचा प्रयत्न केला असता प्रशासनाने रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. मनपातील सेवारत तसेच सेवानवृत्त सफाई कर्मचार्‍यांचे मागील चार महिन्यांपासून वेतन आणि सेवानवृत्ती वेतन थकीत आहे. पाचव्या वेतन आयोगासह सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत असल्यामुळे सफाई कर्मचार्‍यांमध्ये रोष पसरला आहे. गोगानवमीनिमित्त अग्रिम रक्कम, महागाई भत्ता देताना प्रशासनाने आखडता हात घेतल्याचा कर्मचार्‍यांचा आरोप आहे. कंत्राटी पद्धतीनुसार सफाई कर्मचार्‍यांची भरती रद्द करून आस्थापनेवर नवीन सफाई कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी, साफसफाईसाठी विविध साहित्याचा अभाव असून, त्याचा पुरवठा करावा, शासनाच्या धोरणानुसार सफाई कर्मचार्‍यांच्या मंजूर पदावर १५ टक्के अतिरिक्त सफाई कामगारांची नियुक्ती करावी, रजा रोखीकरण, अंशराशीकरणाचा निपटारा करण्यासह विविध मागण्यांची पूर्तता होत नसल्यामुळे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्यावतीने आंदोलन छेडले आहे. मनपा कार्यालयासमोर ६ जुलै रोजी धरणे आंदोलन छेडल्यानंतर बुधवारी (२ ऑगस्ट) शहरात भीक मांगो मोर्चा काढण्यात आला. दुपारी ३ वाजता मनपा कार्यालयासमोर जमलेल्या कर्मचार्‍यांनी गांधी चौक, जुना भाजी बाजार, गांधी रोड परिसरात फिरून अकोलेकरांजवळून पैसे जमा केले. ही रक्कम मनपा उपायुक्त सुरेश सोळसे यांच्याकडे सुपूर्द केली असता त्यांनी रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. आंदोलनात पी.बी. भातकुले, अनुप खरारे, शांताराम निंधाने, विजय सारवान, हरिभाऊ खोडे, धनराज सत्याल, प्रताप सारवान, रमेश गोडाले, मदन धनजे, सोनू पचेरवाल, नारायण मकोरिया, शिवा बोयत, सचिन चावरे, मनोज निंधाने, ईश्‍वर थामेत, सतीश पटोने, सुरेश चौधरी, प्रताप झांझोटे आदींसह असंख्य महिला सफाई कर्मचारी सहभागी होत्या. 

..अन्यथा ९ ऑगस्टपासून कामबंददोन आठवड्यांनंतर गोगानवमी सण आहे. त्यानुषंगाने प्रशासनाने अग्रिम रक्कम, महागाई भत्त्याची रक्कम तातडीने अदा न केल्यास ९ ऑगस्ट पासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.