शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 15:28 IST

खामगाव :  आपले संपुर्ण आयुष्य शेतकरी हितासाठी झटणारे भाजपाचे दिवंगत ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी कृषीमंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांचे कार्य सदैव स्मरण रहावे तसेच शेतकऱ्यांचे हित व्हावे यासाठी राज्य मंत्रीमंडळाने महत्वाचा निर्णय घेत त्यांच्या नावाने ‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’ राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देराज्याच्या मंत्रीमंडळाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’ राज्यात राबविण्यात येणार असल्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ही नवीन योजना राबविण्यात येणार आहे.याबाबतचा संपुर्ण विस्तृत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आला आहे.

-  योगेश फरपट खामगाव :  आपले संपुर्ण आयुष्य शेतकरी हितासाठी झटणारे भाजपाचे दिवंगत ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी कृषीमंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांचे कार्य सदैव स्मरण रहावे तसेच शेतकऱ्यांचे हित व्हावे यासाठी राज्य मंत्रीमंडळाने महत्वाचा निर्णय घेत त्यांच्या नावाने ‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’ राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.स्व.भाऊसाहेब फुंडकर यांनी आपले संपुर्ण आयुष्य शेतकरी हितासाठी खर्चीले, त्यांचे कार्य अफाट आहे. त्यांचे कार्य सदैव स्मरण रहावे यासाठी त्यांचे जीवनावर ग्रंथनिर्मिती करण्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आधीच जाहीर केले आहे. दरम्यान आता राज्यातील फळबागायतदार शेतकरी अधिकाधिक झपाट्याने विकसीत व्हावा, त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी राज्याच्या मंत्रीमंडळाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’ राज्यात राबविण्यात येणार असल्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ही नवीन योजना राबविण्यात येणार आहे.या योजनेसाठी दरवर्षी २०० कोटी रूपये राखीव ठेवण्याचा निर्णयही घेण्यात येणार आहे. या योजनेमध्ये आंबा, डाळींब, काजु, पेरू, सिताफळ, आवळा, चिंच, जांभुळ, कोकम, फणस, कागदी लिंबु, चिकु, संत्रा, मोसंबी, अंजीर व नारळ या फळांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच कोकणात १० हेक्टर तर उर्वरीत महाराष्ट्रात ६ हेक्टर पर्यंत शेतकरी या योजनेचा लाभ घेवू शकतात. याबाबतचा संपुर्ण विस्तृत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आला आहे.‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’ या नव्या योजनेमुळे स्व.भाऊसाहेबांच्या स्वप्नांप्रमाणे शेतकऱ्यांचा खरा विकास होणार असून ते स्वावलंबी निश्चितच बनतील.

टॅग्स :Bhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकरgovernment schemeसरकारी योजनाagricultureशेती