शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

भारिपचे जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य लागले कामाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 12:36 IST

अकोला : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्य कामाला लागले असून, गावा-गावांत पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत.

अकोला : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्य कामाला लागले असून, गावा-गावांत पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत.भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांच्या निर्देशानुसार भारिप-बमसंच्या जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींसह सदस्यांनीही गत दहा दिवसांपासून जिल्ह्यातील गावा-गावांत दौरा करून पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीतील पक्षाची भूमिका यासंदर्भात गावपातळीवरील पक्ष कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात येत आहेत. नेमून दिलेल्या तालुक्यात जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसह सदस्य दररोज सात-आठ गावांना भेटी देत पक्ष कार्यकर्त्यांसोबत चर्चा करीत आहेत.पदाधिकाºयांकडे तालुकानिहाय अशी देण्यात आली जबाबदारी!गावा-गावांत भेटी देऊन पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यासाठी भारिप-बमसंच्या जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांकडे तालुकानिहाय जबाबदारी पक्षाच्यावतीने सोपविण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्याकडे मूर्तिजापूर व बार्शीटाकळी तालुका, उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण यांच्याकडे पातूर व बाळापूर तालुका, महिला व बालकल्याण सभापती देवका पातोंड यांच्याकडे अकोट व तेल्हारा तालुका आणि समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे यांच्याकडे अकोला तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे. नेमून दिलेल्या तालुक्यांमध्ये संबंधित पदाधिकाºयांसह तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य गावांमध्ये जाऊन पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्याच्या कामात गुंतले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ