शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

बहुजन समाजाची मोट बांधण्यात भारिप-बमसंला अपयश !

By admin | Updated: May 16, 2014 21:30 IST

अकोला जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेतील गचाळ कारभार भारिप-बमसंला भोवला; राजकीय विश्लेषकांचे मत

अकोला : बौद्धतेतर समाजाची मोट बांधण्यात आलेले अपयश आणि सत्ता असलेल्या जिल्हा परिषद व महापालिकेतील गचाळ कारभारामुळे लोकसभा निवडणुकीत भारिप-बमसंचे उमेदवार ॲड. प्रकाश आंबेडकर हे तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदेवर भारिप-बमसंची १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून सत्ता आहे. पक्ष संघटनेतही सर्वच समाजातील धुरिणींना स्थान देण्यात आले. वेळोवेळी भारिप-बमसंने इतर समाजातील घटकांना विधानसभा, जिल्हा परिषद आणि महापालिकेतील सत्तेत सहभागी करून घेतले. जेणेकरून लोकसभेत बौद्ध समाजासह सत्तेत सहभागी करून घेतलेल्या समाजातील नेते, पदाधिकार्‍यांची मते पारड्यात पडतील. मात्र, प्रत्येक लोकसभा निवडणुकीत भारिप-बमसंला बौद्ध समाज वगळता इतर समाजातील मते खेचण्यात यश आल्याचे दिसून येत नाही. यंदाच्या निवडणुकीत १ लाख ८२ हजार ३७१ मतदार वाढले. हे नवमतदार खेचण्यात भारिप-बमसंला अपयश आल्याचे दिसून येते. २००९ च्या निवडणुकीत भारिप-बमसंचे उमेदवार ॲड. प्रकाश आंबेडकर यांना २ लाख २२ हजार ६७८ मते तर यंदाच्या निवडणुकीत त्यांना २ लाख ३८ हजार ७७६ मते मिळाली. या निवडणुकीत ते तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले. जिल्हा परिषद आणि मनपामध्ये भारिप-बमसंची सत्ता असून, दिवसेंदिवस जिल्हा आणि महानगराची अवस्था बकाल होत आहे. बहुजन समाजाची मोट न बांधणे, रस्ते, पाणी, आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधा देण्यात पक्षाला यश आलेले नाही.