शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भारिप-बमसंचा घेराव; भाजपाने केले स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:54 IST

अकोला : महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने अवाजवी करवाढ केल्याच्या निषेधार्थ भारिप-बमसंने भाजपा पदाधिकार्‍यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना घेराव घालण्याचा इशारा दिला होता. त्यानुषंगाने शुक्रवारी सकाळी भारिपच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांंनी महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके, स्थायी समिती सभापती बाळ टाले यांच्या निवासस्थानी धडक दिली असता, भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलनकर्त्यांंचे यथोचित स्वागत करीत निवेदन स्वीकारले.

ठळक मुद्देकरवाढीच्या विरोधात आंदोलनपदाधिकार्‍यांच्या निवासस्थानी दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने अवाजवी करवाढ केल्याच्या निषेधार्थ भारिप-बमसंने भाजपा पदाधिकार्‍यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना घेराव घालण्याचा इशारा दिला होता. त्यानुषंगाने शुक्रवारी सकाळी भारिपच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांंनी महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके, स्थायी समिती सभापती बाळ टाले यांच्या निवासस्थानी धडक दिली असता, भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलनकर्त्यांंचे यथोचित स्वागत करीत निवेदन स्वीकारले.सर्वसामान्य अकोलेकरांना मूलभूत सुविधांची पूर्तता न करता सत्ताधारी भाजपाने प्रचंड प्रमाणात करवाढ केली. यामुळे अकोलेकरांवर आर्थिक बोजा निर्माण झाल्याचा आरोप करीत विरोधी पक्ष भारिप-बहुजन महासंघाने सत्ताधार्‍यांसह प्रशासनाविरोधात विविध आंदोलने छेडली होती. १९ ऑगस्ट रोजी महापालिकेच्या सभागृहात आयोजित केल्या जाणार्‍या सर्वसाधारण सभेत सत्ताधार्‍यांनी एकूण कर रकमेच्या दहा टक्के रक्कम सूट देण्याचा विषय पटलावर घेतला आहे. प्रशासनाने संपूर्ण करवाढ रद्द करण्याची मागणी भारिप-बमसंने केली असून, सर्वसाधारण सभेपूर्वी १८ ऑगस्ट (शुक्रवार) रोजी सत्ता पक्षातील प्रमुख पदाधिकार्‍यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना घेराव घालण्याचा निर्णय भारिपने घेतला होता. त्यानुषंगाने भारिपच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांंनी नियोजनानुसार महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके, स्थायी समिती सभापती बाळ टाले यांच्या निवासस्थानी धाव घेतली असता, भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलनकर्त्यांंंचे यथोचित स्वागत केल्यामुळे काही क्षणासाठी आंदोलनकर्तेही बुचकळ्यात पडल्याचे चित्र होते. भारिपचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांंना बसण्यासाठी खुच्र्या, चहा, नाश्त्याची व्यवस्था करण्यात आल्याचे यावेळी दिसून आले. अशा खेळीमेळीच्या वातावरणात भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी निवेदनाचा स्वीकार केला, हे येथे उल्लेखनीय. 

उपमहापौर, सभापतींना निवेदन उपमहापौर वैशाली शेळके यांना जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, माजी मंत्री दशरथ भांडे, माजी जि.प. अध्यक्ष बालमुकुंद भिरड, नगरसेविका किरण बोराखडे, प्रा. प्रसन्नजित गवई, बुद्धरत्न इंगोले यांनी निवेदन दिले. स्थायी समिती सभापती बाळ टाले यांना नगरसेवक बबलू जगताप व इतर कार्यकर्त्यांंंनी निवेदन सादर केले. भारिपने केलेल्या नियोजनानुसार अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांंंनी आंदोलनाकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले. 

महापौरांची अनुपस्थितीमहापौर विजय अग्रवाल यांना निवेदन देण्याची जबाबदारी आ.बळीराम सिरस्कार, माजी आ.हरिदास भदे, कार्याध्यक्ष काशीराम साबळे, प्रतिभा अवचार, मनपातील गटनेत्या अँड.धनश्री देव, जि.प. सभापती देवकाबाई पातोंड, शोभा शेळके, सरला मेश्राम, डॉ. राजकुमार रंगारी, माजी नगरसेविका वंदना वासनिक, गजानन गवई, सुनील जगताप यांच्याकडे होती. महापौर अग्रवाल बाहेरगावी असल्यामुळे त्यांच्या सुविद्य पत्नी नगरसेविका सुनीता अग्रवाल यांनी निवेदन स्वीकारले.