शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

भारत राखीव बटालियनच्या शासन निर्णयात ‘तेल्हारा’ नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 15:46 IST

शासन निर्णयात अकोल्याच्या शिसा उदेगावचाच उल्लेख करण्यात आला असून तेल्हाºयाच्या तेळगाव वडनेरचा उल्लेखचा नसल्याचे समोर आले आहे.

अकोला: तेल्हारा तालुक्यातील तळेगाव वडनेर शिवारात होणाऱ्या भारत राखीव बटालियन कॅम्प तेल्हारा ऐवजी अकोल्यातील शिसा उदेगाव व हिंगणा शिवारात करण्याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयावरून अकोट मतदारसंघातील राजकारण तापले होते. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले. या मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी सारी राजकीय ताकद पणाला लावून मंत्रिमंडळाचा निर्णय फिरविला अन् ही बटालियन पूर्ववत तेल्हाºयातच होईल, असे मुख्यमंत्र्यांचे पत्रही आणले; मात्र १३ सप्टेंबर रोजी शासनाच्या गृह विभागाने काढलेल्या शासन निर्णयात अकोल्याच्या शिसा उदेगावचाच उल्लेख करण्यात आला असून तेल्हाºयाच्या तेळगाव वडनेरचा उल्लेखचा नसल्याचे समोर आले आहे.भारत राखीव बटालियन हा कॅम्प तेल्हारा तालुक्यातील तळेगाव वडनेर शिवारात होणार होता. यासाठी २०० एकर जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असतानाच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते स्थळ बदलून हा कॅम्प शिसा उदेगाव शिवारात मंजूर करण्यात आला होता. राज्यात यापूर्वी तीन ठिकाणी भारत राखीव बटालियन स्थापन करण्यात आली असून, या बटालियनद्वारे कायदा-सुव्यवस्था आणखी प्रभावीपणे सांभाळण्यास मदत होत आहे. ही बाब लक्षात घेता, राज्यात दोन अतिरिक्त बटालियन स्थापन करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे करण्यात आली होती. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात कोर्टी मोक्ता येथे भारत राखीव बटालियन क्र.४ आणि अकोला जिल्ह्यातील अकोला तालुक्यात शिसा उदेगाव व हिंगणा शिवार येथे भारत राखीव बटालियन क्र.५ ची निर्मिती करण्यात येणार आहे. या सर्व कॅम्पसाठी पदांची भरती करण्याकरिता शासन निर्णय आवश्यक होता. त्यामुळे यांनी ६ सप्टेंबर रोजी...पत्र देऊन शासन निर्णय देण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे...यांच्या पत्रातही तळेगाव वडनेरऐवजी शिसा उदेगाव याच गावाचा उल्लेख होता. त्यानुसार गृह विभागाने ६७२ पदांच्या भरतीसाठी १६३ कोटी ४५ लाख ५८ हजार ४८६ रुपये खर्चाला मान्यता देणारा शासन निर्णय शुक्रवारी काढला आहे. या निर्णयामुळे अकोट मतदारसंघात आ. भारसाकळे यांच्या विरोधाकांच्या हाती पुन्हा एकदा मुद्दा मिळाला असून राजकारण तापणार असल्याची चिन्हे आहेत.

शिसा उदेगाव संदर्भातील निर्णयाला खुद्द मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देत हा कॅम्प तेल्हाºयाच्या तळेगाव वडनेर शिवारातच होईल, अशी लेखी ग्वाही दिली आहे. १३ सप्टेंबर रोजी काढलेला शासन निर्णय हा गृह विभागाचा असून, तो पद भरतीचा आहे. कॅम्पसाठी जागेचा शासन निर्णय हा तळेगावचाच निघेल व कॅम्प हा तेल्हाºयातच होईल, याबाबत माझ्या मनात कुठेही शंका नाही. तांत्रिक बाबी लवकरच पूर्ण होतील.- प्रकाश भारसाकळे, आमदार

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराPrakash Bharsakaleप्रकाश भारसाकळे