शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम वऱ्हाडात भारत बंदला गालबोट; पातूरमध्ये सौम्य लाठीचार्ज : रिसोड, कारंजात दुकानांवर दगडफेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 21:39 IST

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात बहुजन क्रांती मोर्चा व इतर संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला पश्चिम वºहाडात गालबोट लागले.

अकोला: सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात बहुजन क्रांती मोर्चा व इतर संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला पश्चिम वºहाडात गालबोट लागले.अकोल्यातील पातुरात आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत रेस्टॉरंट, बस व खासगी वाहनांचे नुकसान झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज केला व दहा आंदोलकांना ताब्यात घेतले. वाशिमधील कारंजा व रिसोड शहरात दुकानांवर दगडफेक तसेच काही वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने या दोन्ही शहरांत तणावपूर्ण शांतता आहे. बुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा आणि शेगाव येथे किरकोळ कारणावरून वाद झाला. यात शेगाव येथील एका दुकानावर दगडफेक झाली तर सोनाळा बसस्थानक परिसरात झालेल्या वादात एक जण जखमी झाला आहे. हे दोन अपवाद वगळता बुलडाणा जिल्ह्यात हा बंद शांततेत पार पडला.सुधारित नागरिकत्व कायदा हा संविधानविरोधी असल्याने सदर कायदा रद्द करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी बहुजन क्रांती मोर्चा व मुस्लीम संघटनांनी २९ जानेवारी रोजी बंदची हाक दिली होती. अकोला जिल्ह्यातील पातूर येथे हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. पातूर येथील पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजंूना वाहतुकीची कोंडी झाली होती. या दरम्यान, काही आंदोलकांनी अचानक दगडफेक केली. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत बसच्या काचा फुटल्या, तर बिकानेर रेस्टॉरंटचेही नुकसान झाले. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी आक्रमक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. अकोला येथूनही पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलाविण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांनी अमोल इंगळे, यासीन खान यांच्यासह दहा जणांना ताब्यात घेतले आहे.वाशिम शहरात मात्र बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. दरम्यान, कारंजा व रिसोड शहरात या बंदला गालबोट लागले. कारंजा शहरात रॅली दरम्यान आंदोलकांनी काही दुकानांवर दगडफेक केली. त्यामुळे या बंदला हिंसक वळण लागल्यामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. दुकानासमोर उभ्या असलेल्या काही वाहनांवर दगडफेक केल्याने वाहनांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या कारंजा शहरात तणावपूर्ण शांतता असून, पोलीस यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. रिसोड शहरातही पुकारलेल्या बंदला दुपारच्या सुमारास गालबोट लागले. आंदोलकांनी तीन, चार दुकानांवर दगडफेक केली तसेच एका खासगी वाहनाच्या काचा फोडल्या.बुलडाण्यातील सोनाळा आणि शेगाव येथे हॉटेल आणि व्यापारी प्रतिष्ठाने बंद करण्यासाठी आंदोलकांनी आग्रह धरल्यामुळे व्यापारी व मोर्चेकरी आमने-सामने आले होते; मात्र पोलिसांनी वेळीच ही परिस्थिती हाताळल्याने पुढील अनर्थ टळला. सोनाळा येथे हॉटेल बंद करण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला. त्यावरून किरकोळ तणाव निर्माण झाला होता; मात्र नंतर परिस्थिती नियंत्रणात आली. शेगावातील अग्रसेन चौकात व्यापारी आणि मोर्चेकरी आमने-सामने आले होते. त्यावेळी मोर्चेकऱ्यांनी तीव्र घोषणाबाजी केली; मात्र पोलिसांनी परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळत मोर्चा दुसºया बाजूने वळविला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या दरम्यान, एका दुकानावर किरकोळ दगडफेक झाल्याचीही माहिती असून, त्यात एका दुकानदाराच्या हाताला मार लागल्याची माहिती आहे.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी