शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

भारत बंद : पातुर, बाळापूरात दगडफेक; पोलिसांचा लाठीचार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 13:34 IST

बहुजन क्रांती मोर्चा व इतर संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला बुधवारी पातुर, बाळापूरात हिंसक वळण लागले

शिर्ला /बाळापूर (अकोला) : सुधारीत नागरिकत्व कायदा (सीएए)व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात बहुजन क्रांती मोर्चा व इतर संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला बुधवारी पातुर, बाळापूरात हिंसक वळण लागले. शांततेत सुरु असलेल्या रास्ता रोको दरम्यान काही आंदोलकांनी दगडफेक केली. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.बहूजन क्रांतीच्या वतीने बुधवार २९ जानेवारी रोजी संपूर्ण भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून अकोला जिल्ह्यातील पातूर येथे हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. पातूर येथील पोलिस ठाण्यासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी झाली होती. रस्त्यावर उतरलेल्या हजारो नागरिकांनी सीएए व एनआरसी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हातात विविध फलक घेऊन उतरलेल्या नागरिकांनी इन्कलाब जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणुन सोडला. दरम्यान, काही आंदोलकांनी अचानक दगडफेक केली. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत बसच्या काचा फुटल्या, तर बिकानेर रेस्टारंटचेही नुकसान झाले. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी आक्रमक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. अकोला येथूनही पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलावण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांनी अमोल इंगळे, यासीन खान यांच्यासह दहा जणांना ताब्यात घेतले आहे. पातूरात आक्रमक आंदोलकांनी शिवसेनेचे पोस्टर फाडल्यामुळे परिस्थती तणावपूर्ण झाली होती. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे परिस्थीत निवळली आहे.बाळापूरातही दगडफेकभारत बंद दरम्यान बाळापूर येथेही आंदोलनास हिंसक वळण लागले. संतत्प झालेल्या आंदोलकांनी अचानक दगडफेक केल्यामुळे परिस्थती चिघळली होती. पोलिसांनी बळाचा वापर केल्यानंतर जमाव नियंत्रणात आला.

 

टॅग्स :AkolaअकोलाBalapurबाळापूरBharat Bandhभारत बंद