शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बीजी-२ कापूस बियाणे उपलब्ध करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 11:30 IST

नांदेड-४४ बीजी-२ कपाशी पाकिटासह पीकेव्ही-२ कापसाचे ८० हजार पाकीट बाजारात उपलब्ध केले जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र राज्य (महाबीज) बियाणे महामंडळाने बाजारात बियाणे पुरवठा सुरू केला असून, यावर्षी नांदेड-४४ बीजी-२ कपाशी पाकिटासह पीकेव्ही-२ कापसाचे ८० हजार पाकीट बाजारात उपलब्ध केले जाणार आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात दुसऱ्या टप्प्यातील टाळेबंदी १५ एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे.२३ मार्चच्या मध्यरात्रीपासून पहिली टाळेबंदी लागू केली होती. यामध्ये राज्य शासनाने कृषीशी निगडित सर्व व्यवहार, वाहतुकीला परवानगी दिली होती. तरीही अनेक विषयासंदर्भात शेतकरी, कृषी संदर्भात संभ्रम असल्याने शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विकण्यास अडचणी आल्या आहेत. आता खरीप हंगाम जवळ येऊन ठेपल्याने दुसºया टप्प्यातील टाळेबंदीत शेतकरी, कृषी विभागाला पूर्ण सूट देण्यात आली आहे. याच अनुषंगाने बियाणे कंपन्या आणि महाबीजने बाजारात आवश्यक बियाणे पुरवठ्याची तयारी केली असून, प्रत्यक्षात पुरवठा सुरू केला आहे. ४.२५ लाख सोयाबीन बियाणे नियोजन महाबीजने केले आहे. त्यातील ९० टक्के बियाणे उपलब्ध झाले आहे. या बियाण्यांचा पुरवठा बाजारात सुरू करण्यात आला आहे. मूग, उडिदाची पेरणी दरवर्षी अनिश्चित असते. पाऊस वेळेवर जून महिन्यात पडला तरच या पिकाची पेरणी केली जाते; परंतु अलीकडच्या काही वर्षात ही दोन्ही पिके शेतकºयांना साथ देत नसल्याचे चित्र आहे. म्हणून शेतकरी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाचे नियोजन करतात. हे नियोजन समोर ठेवून महाबीजने यावर्षीही नांदेड-४४ बीजी-२ कापसाचे ६० हजार पाकीट बाजारात आणण्याचा निर्णय अगोदरच घेतला आहे. तसेच पीकेव्ही-२ बीजी कपाशीचे २० हजार पाकीट बाजारात उपलब्ध करण्यात येत आहेत. पीकेव्ही-२ चे उत्पादन सारखेच गतवर्षी शेतकºयांनी पीकेव्ही बीजी-२ कापसाचे बियाणे पेरणी केली होती; परंतु कापसाचे बोंड छोटे असल्याचे सांगण्यात येत होते; परंतु इतर कापूस जातीपेक्षा पीकेव्ही-२ ला बोंड जास्त लागतात आणि लागवड व इतर कीटकनाशके आदीचा खर्च कमी आहे. त्यामुळे ही मागणी आहे.

बाजारात बियाणे पाठविण्यास सुरुवात करण्यात आली असून, नांदेड-४४ साठ हजार आणि पीकेव्ही-२ बीजी-२ वीस हजार पाकीट उपलब्ध केली जाणार आहेत.- अजय कुचे, महाव्यवस्थापक, (विपणन), महाबीज, अकोला.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूसMahabeejमहाबीज