शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’पासून राहा सावध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 14:27 IST

आजाराची लक्षणे आढळताच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने दिले आहे.

अकोला : चीनमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पृष्ठभूमीवर राज्यात न्यूमोनिया, गंभीर स्वरूपाची श्वसन संस्थेची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांबाबत दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. आजाराची लक्षणे आढळताच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने दिले आहे.चीनमधील कहान शहरात न्यूमोनियाचे अनेक रुग्ण आढळले असून, त्याचे कारण नव्या प्रकारचा कोरोना विषाणू असल्याचे सिद्ध झाले आहे. याबाबत दक्षता म्हणून केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानतळांवर प्रवाशांची तपासणी सुरू केली आहे. या पृष्ठभूमीववर आरोग्यसेवा विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सर्वच आरोग्य संस्थांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुषंगाने जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जनजागृती म्हणून जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांना कोरोनाच्या लक्षणांवर विशेष लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय, नागरिकांनीही लक्षणे दिसताच आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इन्फ्लूएन्झासदृश रुग्ण आणि श्वसन संस्थेचा तीव्र प्रादुर्भाव या आजाराचे सर्वेक्षण सर्व आरोग्य संस्थांनी करणे आवश्यक आहे.कोरोना विषाणू आजाराची लक्षणेसर्दी, खोकलागंभीर स्वरूपाची श्वसन संस्थेची लक्षणे

  • न्यूमोनिया
  • पचनसंस्थेची लक्षणे (उदा. अतिसार)
  • काही रुग्णांमध्ये मूत्रपिंड निकामी होणे

नव्या जनुकीय रचनांचा ‘कोरोना’ विषाणूसर्दी, खोकल्यापासून ते मर्स किंवा सार्ससारख्या गंभीर आजारास कारणीभूत असणाºया एका विशिष्ट प्रकारच्या विषाणू गटाला कोरोना विषाणू म्हटल्या जाते. २००३ मध्ये आढळलेला सार्स हाही एक प्रकारचा कोरोना विषाणूच होता. सध्या चीनमधील उद्रेकात आढळलेला विषाणू हा कोरोना विषाणूच आहे; पण त्याची जनुकीय रचना पूर्णत: नवीन असल्याने त्याला नॉव्हेल कोरोना विषाणू असे नाव देण्यात आले आहे.कोरोना विषाणूचा प्रसार नक्की कशाप्रकारे होतो, याची निश्चित माहिती उपलब्ध नाही; मात्र लक्षणांचे स्वरूप पाहता शिंकणे, खोकणे यावाटे हवेमार्फत या विषाणूचा प्रसार होत असावा, असा अंदाज आहे. या विषाणूसाठी सध्या कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाही. हा प्राणीजन्य आजार असला, तरी कोणत्या प्राण्याच्या संपर्कापासून पसरतो, याबाबतही माहिती नाही.कोरोना विषाणूचा धोका पाहता जिल्ह्यातही नागरिकांमध्ये जनजागृतीचा उपक्रम हाती घेण्यात येत आहे. यासंदर्भात सर्वच पीएचसीला सूचित करण्यात आले आहे.- डॉ. एस. वाय. असोले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना