शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीयांचे उद्योग उभारण्यासाठी सर्वोत्तम काळ  - ‘डिक्की’चे अध्यक्ष मिलिंद कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 14:03 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक समतेचे स्वप्न साकार करण्याचा ‘डिक्की’च्या माध्यमातून हा अल्प प्रयत्न असल्याची माहिती दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजचे (डिक्की) अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी गुरुवारी येथे दिली.

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीपासून पंतप्रधान यांनी ही योजना कार्यान्वित केली असल्याचे कांबळे यांनी सांगितले.महिला उद्योजकांना डिक्की प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला अकोल्याचे उद्योजक सुगत वाघमारे, ‘डिक्की’चे जिल्हा समन्वयक रवींद्र घनबहादूर आदींची उपस्थिती होती.

अकोला : मागासवर्गीयांचे उद्योग उभारण्यासाठीचा सध्या सर्वोत्तम काळ असून, शासनाच्या ‘स्टँडअप’,‘मेक इन महाराष्टÑ’ ‘स्टार्टअप’ योजनेंतर्गत शेकडो मागासवर्गीयांनी उद्योग उभे केले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक समतेचे स्वप्न साकार करण्याचा ‘डिक्की’च्या माध्यमातून हा अल्प प्रयत्न असल्याची माहिती दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजचे (डिक्की) अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी गुरुवारी येथे दिली.मागासवर्गीय उद्योजकांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी कांबळे येथे आले होते. याप्रसंगी एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मागासवर्गीयांचे (अनुसूचित जाती-जमाती) उद्योग उभारण्यासाठी ‘डिक्की’ सरकारच्या धोरणात्मक निर्णयात महत्त्वाची भूमिका बजावत असून, उद्योगांना चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक पाठबळ उभे केले आहे. एवढेच नव्हे, उत्पादित मालाला हक्काची बाजारपेठ निर्माण केली असून, चार टक्के माल खरेदी करण्यासाठीचा कायदाच केल्याने २४ हजार कोटींची उत्पादने शासनाने खरेदी करणे अनिवार्य केले आहे. अनुसूचित जाती ,जमाती हब निर्माण केले. उद्योगांचे स्वरू प पाहून ५० लाख, ५० कोटींपर्यंतचे कर्ज उद्योग उभारण्यासाठी देण्यात येत आहे. देशात २७ सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत. या बँकांच्या १२५ शाखांमधून एका उद्योजकाला अर्थसाहाय्य केल्यास देशात १२५ नवे मागासवर्गीय उद्योजक निर्माण होतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीपासून पंतप्रधान यांनी ही योजना कार्यान्वित केली असल्याचे कांबळे यांनी सांगितले.राज्य शासनाने ‘मेक इन महाराष्ट्र’ योजनेंतर्गत प्रोत्साहन योजना सुरू केली असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रोत्साहन योजनेतंर्गत राज्यातील प्रत्येक औद्योगिक वसाहतीतीत (एमआडीसी) २० प्लॉट राखीव ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. आतापर्यंत १५ औद्योगिक वसाहतीमध्ये १२० मागासवर्गीयांना प्लॉट देण्यात आले असून,१० लाख रू पये अनुदान आहे.तसेच उद्योग उभारण्यासाठी २५ टक्के भांडवली गुतणवूकीसाठी अनुदान दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. मुद्रा योजनेंतर्गत १२ कोटी लोकांना ऋण देण्यात आले. सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत उद्योग उभारण्यासाठी मागासवर्गीयांमध्ये क्षमता बांधणीचे काम करण्यात येत आहे. महिला उद्योजकांना डिक्की प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. पेट्रोलियम मंत्रालयांतर्गत तेल, गॅस वाहतूक व इतर कामे आता मागासवर्गींयाना मिळत असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला अकोल्याचे उद्योजक सुगत वाघमारे, ‘डिक्की’चे जिल्हा समन्वयक रवींद्र घनबहादूर आदींची उपस्थिती होती.

 आता अकोल्यात पैठणीअकोल्यात पहिला पैठणी निर्मितीचा उद्योेग माधुरी गिरी यांनी सुरू केला असून, मिलिंद कांंबळे यांच्या हस्ते गुरुवार, ५ जुलै रोजी या उद्योगाचे उद्घाटन करण्यात आले, यानंतर त्यांनी मेळाव्याला संबोधित केले.

 

टॅग्स :Akolaअकोला