शेगाव: दारिद्रय रेषेवरील नागरिकांना दजेर्दार आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने २९ नोव्हेंबर २0१३ पासून शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना लागू केली. यामागील मुख्य उद्देश आर्थिक दुर्बल घटकांना दजेर्दार आरोग्यसेवा मिळावी हा आहे. मात्र अजुनही कित्येक पात्र लाभार्थ्यांना माहिती अपडेट न होऊ शकल्याने जीवनदायी कार्ड प्राप्त होण्यास विलंब होत आहे. यामुळे अनेक लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित राहावे लागते. त्यावर उपाय म्हणून आता रेशनकार्ड व आधारकार्ड असल्यासही योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात यावा, असा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. नोव्हेंबर २0१३ मध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला. या योजनेंतर्गत ९७१ प्रकारच्या शस्त्रक्रिया, औषधोपचार व १२१ तपासणी उपचारांचा लाभ घेता येणार आहे. जीवनदायी योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटूंबांना कार्डवाटप करण्यात आले. या माहितीसाठी शिधापत्रिकेची माहिती ग्राह्य धरण्यात आली. मात्र संबंधित विभागाने अशा कार्डधारकांची माहितीच अपडेट केली नाही. ज्या कुटूंबांचा डेटा अपडेट केला त्यातही घोळ असल्याचे समोर आले. यात एका कुटूंबातील नावे दुसर्या कुटूंबात गेल्याचे चित्र आहे. या कारणाने अनेकांना जीवनदायी योजनेपासून वंचित राहावे लागत होते. याची दखल घेत शासनाने अखेर शिधापत्रिका व आधारकार्ड असतानाही योजनेचा लाभ देण्याचा संबंधित कंपनी व जिल्ह्यातील रुग्णसेवा देणार्या रुग्णालयाला दिल्या आहेत. या निर्णयामुळे आता राशनकार्ड घेवून रुग्णालयात जाणार्यांनाही या योजनेचा लाभ दिल्या जाणार आहे. विशेष म्हणजे शिधापत्रिकेवर नोंदणीची तारीख असणे बंधनकारक आहे. तशी नोंद नसल्यास तहसील कार्यालयात जाऊन नोंदवून घेणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
कार्डविना मिळणार जीवनदायीचा लाभ
By admin | Updated: May 12, 2014 00:06 IST