शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलांच्या कामांसाठी अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या खात्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 11:07 IST

निधीअभावी रखडलेल्या घरकुल कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.

- संतोष येलकर

अकोला : रमाई आवास योजनेंतर्गत २०१६-१७ व २०१७-१८ या दोन आर्थिक वर्षात मंजूर राज्यातील घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी शासनाकडून १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, घरकुल कामांच्या अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अखेर २२ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे निधीअभावी रखडलेल्या घरकुल कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थींना घरकुल बांधकामांसाठी प्रत्येकी एक लाख २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. २०१६-१७ व २०१७-१८ या दोन आर्थिक वर्षात राज्यात मंजूर करण्यात आलेल्या घरकुलांची कामे लाभार्थीकडून सुरू करण्यात आली; मात्र शासनाकडून निधी उपलब्ध झाला नसल्याने, गत फेब्रुवारीपासून घरकुल कामांच्या अनुदानाची रक्कम राज्यातील घरकुल लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्यात आली नाही. त्यामुळे रमाई आवास योजनेंतर्गत राज्यातील सर्वच जिल्ह्यात गत सात महिन्यांपासून घरकुलांची कामे रखडली होती. त्यानुषंगाने घरकुल कामांच्या अनुदानाची रक्कम केव्हा उपलब्ध होणार, याबाबत लाभार्थीकडून प्रतीक्षा केली जात होती. या पार्श्वभूमीवर रमाई आवास योजनांतर्गत २९१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षातील राज्यातील घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी शासनामार्फत १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, उपलब्ध निधीतून राज्यातील घरकुल लाभार्थींच्या बँक खात्यात घरकुल अनुदानाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया २४ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे.घरकुलांची अपूर्णकामे होणार पूर्ण!रमाई आवास योजनेत २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षातील घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने, निधीअभावी राज्यात अपूर्ण असलेल्या घरकुलांची कामे आता पूर्ण येणार आहेत.रमाई आवास योजनेंतर्गत २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षातील घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील घरकुल लाभार्थींच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.-सौरभ कटियारमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना