शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

घरकुलाचे शेकडो लाभार्थी वंचित; जागा मालकीचा पुरावा न दिल्याने प्रस्ताव नामंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 13:49 IST

अकोला: पात्र लाभार्थींच्या यादीत नाव असतानाही स्वत:च्या नावे जागा नसल्याने जिल्ह्यातील ६०० पेक्षाही अधिक लाभार्थींना घरकुलापासून वंचित राहावे लागले आहे.

ठळक मुद्देआर्थिक, सामाजिक, जातीनिहाय सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात एकूण ६७ हजार लाभार्थी पात्र आहेत. प्राप्त प्रस्तावाला मंजुरी देण्याची प्रक्रिया जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत ३१ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.त्यामध्ये जवळपास ६०० लाभार्थींचे घरकुल मागणीचे प्रस्ताव रद्द करण्यात आले.

अकोला: पात्र लाभार्थींच्या यादीत नाव असतानाही स्वत:च्या नावे जागा नसल्याने जिल्ह्यातील ६०० पेक्षाही अधिक लाभार्थींना घरकुलापासून वंचित राहावे लागले आहे. ३१ मार्च अखेरपर्यंत त्या लाभार्थींचे प्रस्ताव रद्द करण्यात आले. आता पुन्हा त्यांना जागा नियमानुकूल करण्याच्या आदेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. विशेष म्हणजे, पं. दीनदयाळ उपाध्याय घरकुल लाभार्थी अर्थसाहाय्य योजनेतून ५० हजारांपर्यंत मदत देण्याच्या प्रस्तावावर कोणताच निर्णय झाला नसल्याची माहिती आहे.‘सर्वांनाच घरे’ या संकल्पनेनुसार ग्रामीण आणि शहरी भागातील लाभार्थींसाठी पंतप्रधान आवास योजना सुरू झाली आहे. योजनेसाठी २०११ मध्ये झालेल्या आर्थिक, सामाजिक, जातीनिहाय सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात एकूण ६७ हजार लाभार्थी पात्र आहेत. घरकुलांसाठी निवड झालेल्या लाभार्थींची गावात स्वमालकीची जागा असल्यासच लाभ देण्याची अट शासनाने टाकली. चालू वर्षात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला पंतप्रधान आवास योजनेच्या ८,४२६ घरकुलांचा लक्ष्यांक आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींकडून प्राप्त प्रस्तावाला मंजुरी देण्याची प्रक्रिया जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत ३१ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामध्ये जवळपास ६०० लाभार्थींचे घरकुल मागणीचे प्रस्ताव रद्द करण्यात आले. लाभार्थींच्या नावाने स्वमालकीची जागा नाही, या कारणास्तव त्यांना घरकुल नाकारण्यात आले. विशेष म्हणजे, लाभार्थींचे अतिक्रमण नियमानुकूल करून त्यांना लाभ देण्यासाठी शासनाने फेब्रुवारी २०१८ मध्ये निर्णय घेतला; मात्र अत्यल्प कालावधीत प्रक्रिया पूर्ण करणे अशक्य झाल्यामुळे लाभार्थींना वंचित राहण्याची वेळ आली.- अतिक्रमण नियमानुकूल निर्णयाचाही फायदा नाही!ग्रामीण भागातील नागरिकांनी ज्या ठिकाणी अतिक्रमण केले, तेथेच नियमानुकूल करण्यासाठी शासनाने आदेश दिले; मात्र कालावधी कमी असल्याने त्या प्रक्रियेतून लाभार्थींच्या नावे जागा होण्यासही विलंब लागला. त्याचा फायदा चालू वर्षात लाभार्थींना झालाच नाही. अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे द्यावा लागणार आहे. त्यामध्ये गायरान जमिनी, सार्वजनिक वापरातील जमिनी, वनक्षेत्र, ज्या जमिनीवर वास्तव्य करणे शक्य नाही, अशा जमिनी वगळल्या जातील. तसेच आहे त्याच जागेचे अतिक्रमण नियमानुकूल करणे शक्य नसल्यास पर्यायी ठिकाणीही लाभार्थींना जागेचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठीच्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी मंजुरी देतील.-‘रमाई’च्या २००० घरकुलांना मंजुरीचा दावा!रमाई आवास योजनेतून जिल्ह्यात २००० घरकुल मंजूर आहेत. त्यापैकी सर्व लाभार्थींची आॅनलाइन नोंदणी झाल्याचा दावा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, रमाई आवास योजनेतून घरकुलाचा लाभ घेण्यासाठीही स्वमालकीची जागा असणे आवश्यक आहे. त्यापैकीही शेकडो लाभार्थी शासकीय जागेत राहतात. त्यामुळे यंत्रणेच्या दाव्याबाबत शंका आहे.रमाई योजनेचे घरकुलतालुका     घरकुलअकोला -  ४८०अकोट -  ३०६बाळापूर -  २७४बार्शीटाकळी -  १८८मूर्तिजापूर -  ३४२पातूर -  १९४तेल्हारा -  २१६

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदgovernment schemeसरकारी योजना