लोकमत न्यूज नेटवर्कमहान : पावसाळ्यात धरणाचे पाणी गेटमधून सोडण्यास कोणतीही अडचण जाऊ नये, याकरिता धरणाच्या गेटची ग्रीसिंग, रबर सील टाकण्यात येत असून, रिलींगचीसुद्धा कलरिंगची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यामुळे धरणाचा कायापालट होणार आहे. महान धरणाला एकूण १० गेट असून, त्याची साइज ४० बाय १६ फूट असून, या गेटच्या दोन्ही बाजूने कलरिंगची कामे सुरू आहेत. गेटच्या खालच्या बाजूने पाणी लिकेज होऊ नये, याकरिता रबर सील लावण्यात येत आहे; तसेच गेट उघडण्याच्या स्टार्टर कॅबिन बसविण्यात आली, तर आयबी विश्रामगृह ते पर्यटनस्थळ म्हणजेच धरणाच्या समोरील या टोकपासून ते त्या टोकापर्यंत १०० हून अधिक एलईडीची लाइट लावण्यात आले, त्यामुळे धरण आज रोजी रोशनाईने न्हाऊन निघाले आहे, तर भारनियमनाच्या काळात धरणावर इन्व्हर्टर बसविण्यात आले. संकटकाळी गेट उघडण्यासाठी जनरेटरची व्यवस्था असून, त्याचीसुद्धा व्यवस्थित पाहणी करण्यात आली आहे. पावसाळ्यात धरणावर गेट उघडण्यासाठी कुठलीच अडचण जाणवू नये, करिता अत्यंत जबाबदारीने खबर घेण्यात येते, तसेच महान धरणाचे इन्चार्ज एस. व्ही. जानोरकर यांनी सन २०१० साली महान धरणाचा चार्ज स्वीकारला तेव्हापासून सन २०१० ते २०१३ या साली महान धरणाला महापूर आला होता. पूर नियंत्रणावर जानोरकर यांनी जातीने व काळजीपूर्वक लक्ष देऊन नदीकाठावरील एकही गावाचे नुकसान होऊ दिले नाही.
महान धरणाचा होतोय कायापालट!
By admin | Updated: May 16, 2017 01:57 IST